हल्लीच्या लाईफस्टाईलमुळे अनेकांना कमी वयातच स्थूलता, बीपी, शुगर, कोलॅस्ट्रॉल, हृदयरोग अशा व्याधी होऊ लागल्या आहेत. यामुळे हल्ली सगळेच जण फिटनेससाठी वेगवेगळे उपाय करू लागले आहेत. यात डाएट जीम बरोबरच मोजून मापून तेल तूप खाण्याकडे अनेकांचा कल वाढतोय. पण तुम्हाला माहीत आहे का की योग्य पदार्थ योग्य पद्धतीने बनवल्यास १ चमचा तेलातही तुम्ही चक्क चविष्ट आणि हेल्दी पदार्थ सहज बनवू शकता. कोणते आहेत हे पदार्थ ते बघूया.
कमी तेल खाण्याचे फायदे-कॅलरी कम होते.
हृदयाशी संबंधित तक्रारी कमी होतात.
पचन सुधारते.
वजन नियंत्रणात राहते.
उपमा-रव्यापासून तयार होणारा उपमा १ चमचा तेलातही तुम्ही खरपूस भाजून बनवू शकता.
पोहे– पोहे हा लोकप्रिय नाश्त्याचा पदार्थ आहे. १ चमचा तेलात कांदा, शेंगदाणे , हिरवी मिरची परतूनही चविष्ट पोहे बनतात.
ओट्स- १ चमचा तेलात भरपूर भाज्या टाकून ओट्स उपमा बनवता येतो. चवीष्ट आणि हेल्दी असा ओट्स उपमा रात्रीच्या जेवणातही खाऊ शकतात.
मूग डाळ चिला– मूगाच्या डाळीत प्रोटीन्स असते. यामुळे नाश्त्यासाठी हा बेस्ट ऑप्शन पदार्थ आहे. त्यासाठी १ चमचा तेल वापरून चिले बनवता येतात.
बेसन चिला- मूगाप्रमाणेच बेसनाचा चिलाही १ चमचा तेल वापरून बनवता येतो.
उत्तप्पा-उतप्पा हा दाक्षिणात्य पदार्थ आहे. कमी तेलात उतप्पा बनवता येतो.
इडली– इडली हा पदार्थ वाफेवर शिजवावा लागतो. तसेच ईडलीसाठी तेलाची गरज नसली तरी ईडली पात्राला तेल लावावे लागते.
ढोकळा– ढोकळा बनवण्यासाठी तेलाचा वापर करावा लागत नाही. बेसन आणी दही यांचे योग्य प्रमाण घेऊन ढोकळा सहज बनतो.
ओट्स मसाला खिचडी– औट्स मसाला खिचडी बनवण्यासाठी १ चमचा तेलही पुरेसे असते. यात भरपूर भाज्या घालून खमंग खिचडी बनवता येते.
व्हेज कटलेट-लहान मुलांना आवडणारे वेज कटलेटही कमी तेलात बनवता येते. पण त्यासाठी यातील भाज्या गरम पाण्यात एक उकळी येईपर्यंत शिजवून घ्याव्यात. म्हणजे जास्त तेलाची गरज लागत नाही.
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.