पुणे : पुणे महापालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने निवडणुकीत ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना करमाफी देण्याचे आश्वासन दिले होते; मात्र आता केवळ महिलांना आणि तेही एका वर्षासाठी सवलत देऊन पुणेकरांची फसवणूक केल्याचा आरोप आम आदमी पक्षाचे मुकुंद किर्दत यांनी आज केला.
Social Harmony: धर्मापलीकडची माणुसकी! मुस्लिम युवकाच्या वडाची वटसावित्रीला पूजा, गंगापूरमधील वटसावित्री उत्सव ठरला प्रेरणादायी..केंद्रातील मोदी सरकारने सर्वांना घरे, दोन कोटी रोजगार आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याची दिलेली आश्वासने ज्याप्रमाणे जुमला ठरली, त्याचप्रमाणे पुणे महापालिकेतील सत्ताधाऱ्यांचे आश्वासनही केवळ जुमलेबाजी असल्याचे उघड झाले आहे.
राज्य सरकारने 'लाडकी बहीण' योजनेत अडीच हजार रुपये देण्याचे जाहीर केले होते, त्याच धर्तीवर पालिकेतील सत्ताधाऱ्यांनी नागरिकांची दिशाभूल केल्याचे किर्दत यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
शहरातील ५०० चौरस फुटांपर्यंतच्या अनेक घरांवर कर्ज असल्याने ती कमावत्या पुरुषांच्या नावे आहेत. अशा कुटुंबांना या निर्णयाचा मोठा फटका बसणार आहे. असंघटित क्षेत्रात काम करून घर बांधणाऱ्या कुटुंबांमध्ये भेदभाव करणे हा अन्यायकारक निर्णय आहे.
MGNREGA: मनरेगा लाभार्थ्यांना दिलासा! सिंचन विहिरींचे अनुदान विनाअट देणार, विधानसभेत घोषणा, आमदार कैलास पाटील यांच्या मागणीला यशकेवळ लाभार्थ्यांची संख्या कमी करण्यासाठीच महिला मालकांचा निकष लावण्यात आल्याचा दावाही त्यांनी केला. या प्रश्नावर महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने मौन बाळगल्याबद्दल त्यांनी आश्चर्य व्यक्त केले असून, पुणेकरांनी भाजप नगरसेवकांना याबाबत जाब विचारण्याचे आवाहन किर्दत यांनी केले आहे.
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.