कायगाव : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सय्यदपूर येथील शिक्षकांच्या कथित मनमानीविरोधात ग्रामस्थांनी मंगळवारी( ता.30)शाळेला कुलूप ठोकले होते .घटनेची माहिती मिळताच शिक्षण विभागाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले व चर्चा करून मार्ग काढला. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये आणि शाळेतील अध्यापन सुरळीत सुरू राहावे, यासाठी दोन शिक्षकांची प्रतिनियुक्तीवर बुधवारी (ता.1) राजी शाळेत नियुक्ती केली आहे.
ग्रामस्थ पालकांचे आंदोलन, वरिष्ठ अधिकाऱ्यांची धावपळ आणि मग प्रशासनाचा तातडीचा निर्णय - यामुळे पालकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ खपवून घेणार नाही, हा ग्रामस्थांचा निर्धार प्रशासनाला जाणवला.
या प्रकरणी शिक्षण विभागाने गंभीर दखल घेत वसंत कुलट व श्रेया शिनगारे या दोन शिक्षकांना बुधवारी प्रतिनियुक्तीवर हजर करण्यात आले. केंद्रप्रमुख राजेश हिवाळे यांनी प्रशासनाच्या आदेशानुसार त्यांना तातडीने रुजू करून घेतले.
अवघ्या काही तासांत झालेल्या या निर्णयामुळे पालक-ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. आता नव्या शिक्षकांसह शाळेचे अध्यापन व दैनंदिन कामकाज अधिक सुरळीत होणार आहे.
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.