अंबड : जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील लालवाडी येथील प्रगतशील शेतकरी गोवर्धन उगले यांना राज्य शासनाच्या वतीने बुधवारी (ता.1) मुंबई येथील वरळी येथील सरदार वल्लभभाई पटेल सभागृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत कृषीभूषण (सेंद्रिय शेती) पुरस्कार देऊन राज्यपाल जिष्णू देव वर्मा, कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांचे हस्ते प्रदान करण्यात आला.
याप्रसंगी नामदार राधाकृष्ण विखे पाटील, आमदार भरत गोगावलेसह आदींची उपस्थिती होती. गोवर्धन उगले यांचे तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब गंडे, सहाय्यक कृषी अधिकारी अशोक सव्वाशे, प्रगतशील शेतकरी पांडुरंग डोंगरे,दिनेश काकडे, शिवाजीराव गोंटे, मदनराव शिंदे, कैलासराव जिगेसह नातेवाईक मित्रमंडळी यांनी अभिनंदन करत भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.