चंद्रपूर : सावली वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या चिकली चक क्रमांक २ (ता. मूल) येथील बिगर वनक्षेत्रात एका प्रौढ नर वाघाचा मृतदेह आढळून आल्याने वनविभागात एकच खळबळ उडाली आहे. हा वाघ अंदाजे ६ ते ७ वर्षे वयोगटातील असून त्याचा मृत्यू सुमारे एक दिवसापूर्वी झाला असावा, असा प्राथमिक अंदाज वन अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. या घटनेमुळे परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून वाघाच्या मृत्यूमागील कारणाचा शोध घेण्यासाठी वनविभागाने तपास सुरू केला आहे.


वनविभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, सर्व्हे क्रमांक ७८, चिकली चक क्रमांक २ येथे ३० जून रोजी दुपारी १ वाजताच्या सुमारास वाघाचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच सहाय्यक वनसंरक्षक विकास तरसे, वनपरिक्षेत्र अधिकारी विनोद धुर्वे, डब्ल्यूपीएसआयचे प्रतिनिधी मुकेश भांदककर, ईको-प्रोचे राजू काहीलकर, पशुधन विकास अधिकारी डॉ. कुंदन पोडचेलवार, डॉ. विलास गावखरे, डॉ. आकाश गोमकाळे तसेच अक्षय नारनवरे यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली.

Jalgaon News : ‘त्या’ मुलाचा अडीच महिन्यांनंतर उकरला मृतदेह; पित्याच्या आर्त हाकेला प्रशासनाची ‘ओ’; अखेर मृत्यूच्या कारणांचा शोध सुरू

यानंतर राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या प्रतिनिधी आणि पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत वाघाच्या मृतदेहाची सखोल तपासणी करण्यात आली. प्राथमिक तपासणीत वाघाच्या शरीरावरील सर्व अवयव सुस्थितीत असल्याचे आढळून आले. त्यामुळे शिकारीचा संशय सध्या तरी व्यक्त करण्यात आलेला नाही. त्यानंतर राजोली येथील रोपवाटिकेत नियमानुसार शवविच्छेदन करण्यात आले.

Tarapur MIDC: विराज प्रोफाइल्समध्ये पुन्हा धक्कादायक घटना; ट्रकचालकाचा संशयास्पद मृत्यू, औद्योगिक वर्तुळात खळबळ..

मात्र, शवविच्छेदनानंतरही वाघाच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. मृत्यूचे खरे कारण समोर यावे यासाठी आवश्यक नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार असल्याची माहिती वनविभागाच्या सूत्रांनी दिली. दरम्यान, वनपरिक्षेत्र अधिकारी विनोद धुर्वे यांनी या प्रकरणाचा सर्वंकष तपास सुरू असून अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे सांगितले. या घटनेमुळे वन्यजीवप्रेमींमध्येही चिंता व्यक्त केली जात आहे.

Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.