राजापूर: राजापूरच्या ऐतिहासिक ओळखीचा अविभाज्य भाग असलेल्या ब्रिटिशकालीन वखारीच्या सुशोभीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. शासनाकडून मंजूर झालेल्या सुमारे दोन कोटी रुपयांच्या निधीतून गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेल्या या कामामुळे ऐतिहासिक वास्तूला नवसंजीवनी मिळत असून, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देणारी ही वास्तू लवकरच पर्यटनाच्यादृष्टीने आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे.

Social Harmony: धर्मापलीकडची माणुसकी! मुस्लिम युवकाच्या वडाची वटसावित्रीला पूजा, गंगापूरमधील वटसावित्री उत्सव ठरला प्रेरणादायी..

सोळाव्या-सतराव्या शतकात राजापूर हे महत्त्वाचे व्यापारी बंदर आणि निर्यात केंद्र म्हणून प्रसिद्ध होते. विविध भागांतून येणारा माल येथे साठवून त्याची देश-विदेशात निर्यात केली जात होती. त्या काळात ब्रिटिशांनी येथे वखार उभारून व्यापाराचे प्रमुख केंद्र विकसित केले होते; मात्र, नदीपात्रात गाळ साचणे, जलवाहतूक बंद पडणे आणि स्वातंत्र्यानंतर ब्रिटिश व्यापार संपुष्टात आल्याने वखार कालांतराने दुर्लक्षित झाली.


या ऐतिहासिक वास्तूचे जतन करण्यासाठी ‘माय राजापूर’ संस्थेने शिवसृष्टी उभारणीचा प्रस्ताव तयार केला होता. आमदार प्रमोद जठार यांच्या पाठपुराव्यानंतर शासनाने सुशोभीकरणासाठी निधी मंजूर केला. सध्या वखारीची इमारत, परिसर आणि रंगरंगोटीचे काम पूर्ण झाले असून, अंतर्गत सजावटीचे काम सुरू आहे. ते पूर्ण झाल्यानंतर वखारीला आकर्षक स्वरूप प्राप्त होणार आहे.

अनेकदा लुटलेली वखार

ब्रिटिशांनी सुमारे १६४९च्या सुमारास राजापूर येथे व्यापारासाठी ही वखार उभारली. येथे त्यांचे कार्यालय, अधिकाऱ्यांची निवासस्थाने तसेच संरक्षणासाठी तटबंदी, बुरुज, दारूगोळा आणि तोफा होत्या; मात्र खोटी माहिती देणाऱ्या इंग्रजांना धडा शिकवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी या वखारीवर अनेकदा स्वारी करून ती लुटली. १६६१ मध्ये महाराजांच्या हल्ल्यानंतर वखार बंद पडली, १६६८ मध्ये पुन्हा सुरू झाली आणि १६७० मधील स्वारीनंतर पुन्हा बंद झाली.

MGNREGA: मनरेगा लाभार्थ्यांना दिलासा! सिंचन विहिरींचे अनुदान विनाअट देणार, विधानसभेत घोषणा, आमदार कैलास पाटील यांच्या मागणीला यश तटबंदी आणि बुरुजांच्या दुरुस्तीची अपेक्षा

वखारीच्या इमारतीचे सुशोभीकरण पूर्णत्वाकडे जात असले तरी लगतची तटबंदी आणि बुरुज अद्याप ढासळलेल्या अवस्थेत आहेत. ऐतिहासिक वास्तूचे संपूर्ण संवर्धन करण्यासाठी या संरक्षण भिंतींचीही तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.

Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.