टीम इंडिया श्रेयस अय्यर याच्या नेतृत्वात इंग्लंड विरुद्ध टी20i मालिकेत 2 हात करण्यासाठी सज्ज झाली आहे. उभयसंघातील पहिल्या टी 20i सामन्याला थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे. सामन्यातील पहिला चेंडू हा भारतीय वेळेनुसार रात्री 10 वाजता टाकण्यात येणार आहे. त्याआधी 9 वाजून 30 मिनिटांनी टॉस झाला. भारताच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला. कर्णधार श्रेयस अय्यर याने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे टीम इंडियाची युवा ब्रिगेड इंग्लंड विरुद्ध किती धावा करण्यात यशस्वी ठरते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.




वैभवला संधी नाहीच


आयर्लंड विरूद्धच्या टी 20i मालिकेनंतर वैभव सूर्यवंशी याला इंग्लंड विरूद्धच्या पहिल्या सामन्यातही संधी देण्यात आलेली नाही. त्यामुळे वैभवला पदार्पणासाठी आणखी प्रतिक्षा करावी लागणार आहे.





हेड टु हेड रेकॉर्ड्स


टीम इंडियाची 2022 नंतर इंग्लंडमध्ये टी 20i मालिका खेळण्याची ही पहिलीच वेळ ठरणार आहे. टीम इंडियाने इंग्लंड विरुद्ध सलग 5 टी 20i मालिका जिंकण्याची कामगिरी केली आहे. तसेच टीम इंडिया इंग्लंड विरुद्ध सर्वात छोट्या फॉर्मेटमध्ये वरचढ असल्याचं आकड्यातून स्पष्ट होतं.




टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील हा 31 वा टी 20i सामना असणार आहे. भारताने याआधी 30 पैकी सर्वाधिक 18 सामने जिंकले आहेत. तर इंग्लंडने 12 सामन्यांत विजय मिळवला आहे.


सामना कुठे?


उभयसंघातील सामन्याचं आयोजन हे चेस्टर ली स्ट्रीटमधील रीव्हरसाईड ग्राउंड स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. या मैदानात 2025 पासून एकूण 12 टी 20i सामने खेळवण्यात आले आहेत. या 12 पैकी सर्वाधिक 8 सामन्यांत पहिले बॅटिंग करणारी टीम जिंकली आहे. तर चेजिंग करणाऱ्याने संघाने 4 वेळा विजय मिळवला आहे. त्यामुळे 13 व्या सामन्याचा निकाल टीम इंडियाच्या बाजूने लागणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.


इंग्लंड प्लेइंग ईलेव्हन : फिलिप सॉल्ट, जोस बटलर (विकेटकीपर), हॅरी ब्रूक (कर्णधार), जेकब बेथेल, टॉम बँटन, सॅम करन, विल जॅक्स, लियाम डॉसन, साकिब महमूद, आदिल रशीद आणि ल्यूक वुड.


टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : संजू सॅमसन, अभिषेक शर्मा, इशान किशन (विकेटकीपर), श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा, शिवम दुबे, अक्षर पटेल, हर्षित राणा, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग आणि वरुण चक्रवर्ती.

Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.