-मनोज कुंभार
वेल्हे,(पुणे): राजगड व हवेली तालुक्याला जोडणारा महत्त्वाचा मार्ग असणाऱ्या कुसगाव खिंडीत गुरुवार (ता.02 रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास कोसळलेली दरड प्रशासनाच्या वतीने बाजूला करण्यात आली असल्याची माहिती राजगडचे तहसीलदार निवास ढाणे यांनी दिली.
Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..राजगड तालुक्यामध्ये घाटमाट्यावरती गेल्या दोन दिवसांमध्ये पावसाचा जोर थोडा वाढला असून या ठिकाणी कुसगाव खिंडीच्या माथ्यावरती दरड कोसळल्यामुळे चार चाकी वाहनांची वाहतूक ठप्प झाली होती. या ठिकाणावरून धोकादायक पद्धतीने फक्त दुचाकी ये-जा करत होत्या.
ग्रँड टूर सायकल स्पर्धेच्या निमित्ताने तयार झालेले या खड्डा विरहित रस्त्यांवरती मोठ्या प्रमाणात वाहतूक वाढली असून खेडशिवापूर टोलविरहित मार्गासाठी राजगड तालुक्यातील हजारो नागरिक पर्यटक याच रस्त्याने प्रवास करत असल्याने मोठ्या प्रमाणामध्ये या रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती. घटनेची माहिती प्रशासनास मिळाल्यानंतर तहसीलदार ढाणे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागास सूचना दिल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता प्रकाश गाडे यांनी घटनास्थळी जेसीपी पाठवून दरड बाजूला करण्यात आली.यावेळी सामाजिक कार्यकर्ते चेतन शिळीमकर, विठ्ठल गोरे उपस्थित होते.
Social Harmony: धर्मापलीकडची माणुसकी! मुस्लिम युवकाच्या वडाची वटसावित्रीला पूजा, गंगापूरमधील वटसावित्री उत्सव ठरला प्रेरणादायी..राजगड चे तहसीलदार निवास ढाणे म्हणाले, 'रात्रीच्या वेळेस दरड कोसळली नसल्याने मोठी दुर्घटना टळली. मात्र पावसाचा जोर वाढल्यानंतर रात्रीच्या वेळेस या घाटमाथ्यामधून प्रवास करणे टाळावे व दिवसा फोटो व शूटिंगसाठी घाटात थांबू नये असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.