खडकवासला : खडकवासला धरणसाखळीतील पाणीसाठ्यात यंदा आणि गतवर्षी मोठी तफावत दिसून येत आहे. गेल्या वर्षी आजच्या दिवशी धरणांमध्ये १५.५५ टीएमसी, तर यंदा केवळ ३.८१ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध असून तो गतवर्षीच्या तुलनेत जवळपास पाचपट कमी आहे. सध्याचा उपलब्ध साठा पुणे शहरासाठी केवळ ७६ दिवस पुरेल इतकाच असल्याने, मान्सून जोर धरेपर्यंत पाणी काटकसरीने वापरण्याची गरज निर्माण झाली आहे.
Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..पुणे महापालिका दैनंदिन सुमारे ५० दशलक्ष घनफूट (एमसीएफटी) पाणी वापरते. गतवर्षी चार ही धरणांमध्ये १५.५५ टीएमसी पाणीसाठा जमा झाला होता. हा सुमारे ३११ दिवस, म्हणजे जवळपास दहा महिने पुरेल एवढे पाणी जमा झाले होता. तर यंदा अवघा ३.८१ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे. यंदा अवघे ७६ दिवस, म्हणजेच सव्वा दोन महिने पुरेल एवढेच पाणी शिल्लक आहे.
बुधवारी सकाळी सहा वाजल्यापासून आज गुरुवारी संध्याकाळी पाच वाजेपर्यंत या ३५ तासांत पानशेत धरण परिसरात ४० मिमी, वरसगावमध्ये ३९ मिमी, टेमघरमध्ये ७५ मिमी आणि खडकवासला धरण परिसरात ६ मिमी पावसाची नोंद झाली.
फक्त तीन दिवसाचे पाणी जमाखडकवासला धरणसाखळीच्या पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पावसाला सुरुवात झाल्याने धरणांतील पाणीसाठ्यात वाढ होऊ लागली आहे. ३० जून रोजी सकाळी ६ ते २ जुलै रोजी सायंकाळी ५ या ५९ तासांच्या कालावधीत धरणसाखळीच्या उपयुक्त पाणीसाठ्यात १६५ दशलक्ष घनफूट (एमसीएफटी) वाढ झाली आहे. सध्या पुणे महानगरपालिकेकडून दररोज सुमारे ५० एमसीएफटी पाणी उचलले जात असल्याने, ही वाढ पुणे शहराच्या सुमारे तीन दिवसांसाठी लागणारे पाणी जमा झाले आहे. सध्या अजून देखील गंभीर परिस्थिती आहे.
Social Harmony: धर्मापलीकडची माणुसकी! मुस्लिम युवकाच्या वडाची वटसावित्रीला पूजा, गंगापूरमधील वटसावित्री उत्सव ठरला प्रेरणादायी.."गतवर्षीच्या तुलनेत यंदा खडकवासला धरण साखळीतील पाणीसाठा जवळपास पाचपट कमी आहे. सध्याचा उपलब्ध साठा शहराची केवळ सव्वा दोन महिन्यांची गरज भागवू शकतो. त्यामुळे पाणी वापरणाऱ्या सर्व यंत्रणा आणि नागरिकांनी उपलब्ध पाण्याचे काटेकोर नियोजन करून अत्यंत जपून वापर करणे आवश्यक आहे."
– किरण देशमुख, कार्यकारी अभियंता, खडकवासला पाटबंधारे विभाग
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.