पैठण: शहरातील एका किराणा व्यापाऱ्याचा नाथसागर धरणात बुडाल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी (ता. २) सकाळी घडली. देवेंद्र कमलनारायण खंडेलवाल (वय ४५) असे या बुडालेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच पैठण पोलिसांसह नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत शोधमोहीम सुरू केली.
Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..सायंकाळी त्यांचा शोध घेवुन त्याचा मृतदेह पाण्यातुन काढला. दरम्यान, ही घटना बुडन मृत्यू की आत्महत्या या बाबत संशय व्यक्त होत आहे. पोलिसांनी सांगितले की, देवेंद्र खंडेलवाल हे गुरुवारी सकाळी नाथसागर धरण परिसरात पोहण्यासाठी गेले होते. धरणात पाण्याच्या साठ्यात वाढ व मोठे वारे वाहत असल्यामुळे अंदाज न आल्याने ही घटना घडली.
बुडत असल्याचे लक्षात येताच त्यांनी मदतीसाठी आरडाओरड केली. परिसरातील काही तरुणांनी तातडीने पैठण पोलीस ठाण्याशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच पैठण पोलिसांचे पथक व नगरपरिषदेचे अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले.
Social Harmony: धर्मापलीकडची माणुसकी! मुस्लिम युवकाच्या वडाची वटसावित्रीला पूजा, गंगापूरमधील वटसावित्री उत्सव ठरला प्रेरणादायी..दरम्यान, नाथसागर धरण परिसरात नागरिकांनी पाण्याची पातळी वाढत असुन असताना जोरदार वारा असताना पोहण्याचे धाडस करू नये, असे आवाहन पोलिस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.