कुडाळ (सिंधुदुर्ग) : जिल्ह्यात वन्यजीवांच्या अवयवांची बेकायदेशीर विक्री प्रकरणी वनविभागाने येथे बाजारपेठेतील ‘मसुरकर जेम्स’ या दुकानावर छापा टाकत बिबट्याची नखे, दात आणि इतर अवयवांसह मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी दुकानाचा मालक अजित वसंत मसुरकर याला अटक केली असून, न्यायालयाने त्याला दोन दिवसांची वनकोठडी (Kudal wildlife trafficking case) सुनावली आहे.
याबाबत वनविभागाने दिलेली माहिती अशी : सावंतवाडीच्या वनक्षेत्रपालांना ३० जूनला येथील बाजारपेठेत वन्यजीवांच्या अवयवांची बेकायदेशीर विक्री होत असल्याची माहिती मिळाली होती. याआधारे सावंतवाडी वनक्षेत्रपाल आणि कुडाळचे वनपरिक्षेत्र अधिकारी व त्यांच्या पथकाने संयुक्तपणे ‘मसुरकर जेम्स’ या दुकानाची दोन पंचांसमक्ष झडती घेतली.
Pune Dam Water Level : पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी! खडकवासला धरणसाखळीत पावसाचा जोर; टेमघर, पानशेत, वरसगाव धरणांची ताजी स्थिती काय?दुकानातून वन्यजीवांचे अवयव जप्त करण्यात आले आहेत. ज्यामध्ये बिबट्याची सहा नखे, वन्यप्राण्यांच्या शिंगांपासून तयार केलेली सहा नखे, बिबट्याच्या नखांचे २० अवयव आणि बिबट्याचे दोन दात (सुळे) हस्तगत केले. हा सर्व मुद्देमाल वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ च्या अनुसूची एक अन्वये अत्यंत संरक्षित असलेल्या बिबट्याची शिकार करून, त्यापासून मृगयाचिन्हे तयार करून विक्री करण्याच्या उद्देशाने बेकायदेशीरपणे बाळगण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात आला.
वनविभागाने हा सर्व मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी वनक्षेत्रपाल सावंतवाडी यांनी आपल्या कार्यालयात गुन्हा दाखल केला आहे. संशयित मसुरकरवर वन्यप्राणी बिबट्याची नखे विक्रीच्या उद्देशाने ताब्यात बाळगल्याचा गुन्हा दाखल करून वनविभागाने त्याला अटक केली. कुडाळच्या प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाने त्याला २ दिवसांची वनकोठडी सुनावली आहे.
Kolhapur ACB Trap : शाहूवाडीत PWD च्या शाखा अभियंत्याला 38 हजारांची लाच घेताना रंगेहात अटक; 'या' कामाच्या बिलासाठी मागितली होती रक्कमही कारवाई सावंतवाडीचे उपवनसंरक्षक मिलीश शर्मा आणि कोल्हापूर दक्षता विभागाचे विभागीय वनअधिकारी संजय वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच डॉ. सुनील लाड यांच्या नेतृत्वाखाली झाली. या कारवाईत सावंतवाडीचे वनक्षेत्रपाल सचिन शिडतुरे, कुडाळचे वनपरिक्षेत्र अधिकारी चेतन पाटील, वनपाल महेश पाटील, गौरेश राणे (पोह), मालवणचे वनपाल सदानंद परब, नेरूरचे वनपाल सूर्यकांत सावंत, वनरक्षक समीर खरवत, रवींद्र पाटील, ऋषिका होले, प्रसाद पाटील तसेच चालक राहुल मयेकर आणि नितीन सावंत यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
Gold Smuggling Sangli Man Arrested : आसाममध्ये सोने तस्करी करणारा संशयित दिघंचीचा? सोन्याच्या तस्करीविरोधात मोठी कारवाई, 55 कोटींची सोन्याची बिस्किटे जप्तसिंधुदुर्ग निसर्गसंपन्न असून येथे बिबट्या, रानगवा, सांबर, खवलेमांजर, पिसोरी आदी वन्यजीवांचा अधिवास आहे. भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अन्वये वन्यप्राण्यांची शिकार करणे, अवयव किंवा मृगयाचिन्हे बाळगणे किंवा त्यांचा व्यापार करणे हा गंभीर गुन्हा असून, यासाठी सात वर्षांपर्यंत कारावास आणि दंडाची तरतूद आहे. असे बेकायदेशीर कृत्य आढळल्यास नागरिकांनी त्वरित वनविभागाशी संपर्क साधावा, माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवू.
-मिलीश शर्मा, उपवनसंरक्षक
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.