Khashaba Movie Teaser Released : जिओ स्टुडिओज आणि आटपाट प्रॉडक्शन्सचा बहुप्रतिक्षित मराठी क्रीडा-बायोपिक 'खाशाबा'चा दमदार टीझर आज प्रदर्शित करण्यात आला. स्वतंत्र भारताला पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक मिळवून देणारे दिग्गज कुस्तीपटू खाशाबा दादासाहेब जाधव यांच्या प्रेरणादायी जीवनावर आधारित हा चित्रपट १ जानेवारी २०२७ रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.


राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. 'फँड्री' आणि २०१६ मधील सुपरहिट 'सैराट'नंतर ते पुन्हा एकदा महत्त्वाकांक्षी मराठी चित्रपटासह प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. 'धुरंधर', 'धुरंधर: द रिव्हेंज' आणि 'राजा शिवाजी' यांसारख्या भव्य चित्रपटांनंतर जिओ स्टुडिओज आणखी एका ऐतिहासिक सिनेमॅटिक अनुभवाची निर्मिती करत आहे.

खाशाबा जाधव यांच्या संघर्षाची प्रेरणादायी कहाणी

चित्रपटात खाशाबा जाधव यांच्या संघर्षमय प्रवासाचे चित्रण करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील पारंपरिक कुस्तीच्या आखाड्यांपासून सुरू झालेला त्यांचा प्रवास १९५२ च्या हेलसिंकी ऑलिम्पिकपर्यंत पोहोचतो. अनेक अडचणींवर मात करत त्यांनी कांस्यपदक जिंकून भारतीय क्रीडा इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद केली. स्वतंत्र भारतासाठी वैयक्तिक ऑलिम्पिक पदक जिंकणारे ते पहिले खेळाडू ठरले.

Gagangad Fort : स्वामी गगनगिरी महाराजांची तपोभूमी अन् शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेला 'गगनगड' ठरला राज्य संरक्षित स्मारक; शासनाचा मोठा निर्णय संभाजीराजे छत्रपती साकारणार शहाजी महाराजांची भूमिका

या चित्रपटाचे आणखी एक विशेष आकर्षण म्हणजे, माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांची भूमिका. संभाजीराजे यांनी आपल्या फेसबूक पोस्टमध्ये लिहिलंय, “खाशाबा” या चित्रपटात माझ्या हृदयाच्या अत्यंत जवळ असणाऱ्या पूजनीय व्यक्तिमत्वाची भूमिका साकारण्याची मला संधी मिळाली, असं त्यांनी म्हटलंय.


त्यांच्या या पोस्टनंतर अनेकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली. संभाजीराजेंच्या हृदयाच्या अत्यंत जवळ असणारी पूजनीय व्यक्ती कोण? त्यांनी चित्रपटात नेमकी कोणाची भूमिका साकारली आहे? असे प्रश्न निर्माण झालेले.



दरम्यान, संभाजीराजेंनी त्यांच्या आजोबांची म्हणजेच, भोसले घराण्यातील कोल्हापूर संस्थानचे राजे छत्रपती शहाजी महाराज (दुसरे शहाजी) यांची भूमिका साकारली आहे. ऑलिम्पिक स्पर्धेसाठी खाशाबा जाधव यांना शहाजी महाराजांनी दिलेल्या महत्त्वपूर्ण सहकार्याचा प्रसंगही चित्रपटात दाखविण्यात आला आहे.

टीझरमध्ये पारंपरिक कुस्तीची भव्य झलक

आज प्रदर्शित झालेल्या टीझरमध्ये महाराष्ट्रातील पारंपरिक कुस्तीच्या आखाड्यांचे प्रभावी आणि भव्य चित्रण पाहायला मिळते. स्वातंत्र्योत्तर भारताच्या पार्श्वभूमीवर उलगडणारी ही कथा देशासाठी इतिहास घडविणाऱ्या एका क्रीडा-नायकाचा प्रेरणादायी प्रवास प्रेक्षकांसमोर मांडते.

अजय-अतुल यांचे संगीत

चित्रपटाला प्रसिद्ध संगीतकार जोडी अजय-अतुल यांनी संगीत दिले आहे. विशेष म्हणजे, खाशाबा दादासाहेब जाधव यांची मुख्य भूमिका कोण साकारणार, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. या भूमिकेसाठी एका नव्या चेहऱ्याला संधी देण्याचा निर्मात्यांचा मानस असल्याची माहिती समोर आली आहे.


'खाशाबा' हा चित्रपट केवळ एका महान खेळाडूची जीवनकहाणी नसून, जिद्द, संघर्ष आणि देशासाठी इतिहास घडविणाऱ्या एका असामान्य व्यक्तिमत्त्वाला वाहिलेली सिनेमॅटिक आदरांजली ठरणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.