भारतात प्रत्येक इमारतीच्या गॅलरीत कपडे वाळत घातलेले दिसत असतात.दुबईतील महानगर पालिकेचे नियमांनुसार मात्र कपडे गॅलरीत वाळत टाकल्यास कारवाई केली जाते. मग, दुबईत नेमके कपडे वाळत घालण्याची नेमकी पद्धत काय असते ?
दुबईतील इमारतीच्या खिडक्या किंवा बाल्कनीत कपडे टांगलेले कधी दिसत नाहीत. कारण तेथे महानगर पालिकेचे तसे नियम आहे. कपडे प्रदर्शनीय भागात वाळत टाकल्याने इमारतीची शोभा तर जातचे शिवाय या कपड्यांचे पाणी पडून इतर रहिवाशांना देखील त्रास होत असतो.
त्यामुळे दुबईत दर्शनिय भागात कपडे वाळत घातल्यास मोठी दंडात्मक कारवाई केली जाते. मग दुबईचे लोक कपडे कुठे वाळत घालतात हा प्रश्न तुम्हाला पडला असेल.
दुबईत कपडे बाहेर वाळत घातल्यास ५०० ते १५०० दिरहम ( सुमारे ११ हजार ते ३३ हजार ) रुपयांपर्यंतचा दंड आकारला जाऊ शकतो.काही हाऊसिंग कम्युनिटी आणि बिल्डींग मॅनेजमेंट उदा. Nakheel च्या योजनेत या नियमांना अधिक कठोरपणे राबवले जाते.
दुबईत राहाणारे बहुतांश लोक कपडे वाळवण्यासाठी अत्याधुनिक तंत्राचा वापर करतात. सर्वात सोपी पद्धत म्हणजे इनडोअर ड्राईंग रॅकचा वापर, फोल्डींग ड्राईंग स्टँडला लोक बेडरुम, युटिलिटी एरिया वा लिव्हींग रुममध्ये लावून कपडे सुखवतात. जर बाल्कनीत रॅक ठेवला तर त्याच्या आड पडदा लावला जातो.ज्यामुळे कपडे बाहेरच्या बाजूने दिसत नाहीत.
तसेच अनेक इमारतीत वॉशर ड्रायर वा टम्बल ड्रायरची सुविधा देखील असते. मशीन गरम हवे कपडे सुखवते. यासाठी उन्हाची गरज लागत नाही. अनेक इमारतीत युटिलिटी बाल्कनी एरिया किंवा लाँड्री एरिया असतो. जेथे मर्यादित प्रमाणात उन्ह आणि हवा असते.
दुबईचे वातावरण देखील कपडे लवकर सुखवते. येथील उष्ण आणि शुष्क हवामान असल्याने तसेच चांगल्या स्पिन ड्रायरच्या वॉशिंगमशिनमुळे कपडे लवकर सुखतात. दुबईत श्रीमंत लोकांची वस्ती असल्याने येथील लॉण्ड्री सर्व्हीस सर्वसामान्य गोष्ट आहे. अनेक कंपनीचे कर्मचारी घरातून कपडे घेऊन जातात आणि धुवून, वाळवून इस्री करुन घरपोच आणून देतात.
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.