अमरनाथ यात्रेसाठी शिवभक्तांची पहिली तुकडी गुरूवारी रवाना झाली आहे. 3 जुलै ते 28 ऑगस्टपर्यंत अमरनाथ यात्रा असणार आहे. ही यात्रा 57 दिवसांची असणार आहे. वेगवेगळ्या तुकड्यांमध्ये शिवभक्त बाबा बर्फानीचं दर्शन घेणार आहे. दरवर्षी साडेतीन लाखांहून अधिक भाविक अमरनाथ यात्रा करत असतात. 2025 मध्ये 5 लाख भाविकांनाी दर्शन घेतलं होतं. यंदाही हा आकडा अधिक असण्याची शक्यता आहे. मागच्या वर्षी 3 जुलै रोजी यात्रेला सुरूवात झाली होती. यंदाही 3 जुलैला यात्रा सुरू होणार आहे. मात्र त्याच्या आधीच्या वर्षात या तारखा वेगवेगळ्या होत्या. 2022 मध्ये 30 जून ते 11 ऑगस्ट अशी 43 दिवसांची यात्रा, 2023 मध्ये 1 जुलै ते 31 ऑगस्ट अशी 62 दिवसांची यात्रा, 2024 मध्ये 29 जून ते 19 ऑगस्ट अशी 52 दिवसांची, 2025 मध्ये 3 जुलै ते 9 ऑगस्ट अशी 38 दिवसांची यात्रा होती. त्यामुले यात्रा सुरू आणि समाप्तीच्या तारखा दरवर्षी वेगवेगळ्या आहेत. आता प्रश्न असा आहे की अमरनाथ यात्रेची तारीख दरवर्षी का बदलते? जाणून घ्या.

अमरनाथ यात्रेची तारीख का बदलते?

अमरनाथ यात्रेच्या तारखा या काही इंग्रजी कॅलेंडरनुसार ठरवल्या जात नाही. या यात्रेची सुरूवात हिंदू पंचांगानुसार निश्चित केली जाते. हिंदू पंचांग हे चंद्राच्या तिथीवर अवलंबून असते. तर ग्रेगोरियन कॅलेंडर हे सौर तिथीवर असतं. त्यामुळे अमरनाथ यात्रेच्या सुरूवातीच्या आणि शेवटच्या तारखा इंग्रजी कॅलेंडरनुसार बदलतात. हिंदू पंचांग म्हणजेच चांद्रवर्ष हे 354 दिवसांचं असतं. तर इंग्रजी सौर वर्ष हे 365 दिवसांचं असतं. त्यामुळे दरवर्षी 11 दिवसांचा फरक असतो. हा फरक भरून काढण्यासाठी तीन वर्षांनी अधिक मास असतो. हिंदू पंचांगानुसार ही यात्रा आषाढ महिन्यात होते आणि श्रावण महिन्यातील राखी पौर्णिमेला संपते. कारण यात काळात अमरनाथ गुहेतील नैसर्गिकरित्या तयार झालेलं शिवलिंग पूर्ण आकारात असते.

अमरनाथ गुफेची खासियत आणि श्रद्धा

अनंतनाग जिल्हा अमरनाथ गुहेसाठी प्रसिद्ध आहे. ही गुहा पहलगामपासून 48 किमी अंतरावर आणि 5486 मीटर उंचीवर आहे. बहुतांश काळ ही गुहा बर्फाने झाकलेली असते. तर उन्हाळ्यात थोड्या कालावधीसाठी तिचं प्रवेशद्वार उघडलं जातं. यात शिवलिंगाचं प्रतिक असलेलं बर्फाचं लिंग आहे. दोन छोटे स्तंभ देवी पार्वती आणि पुत्र गणेशाचं प्रतीक मानलं जातं. अनंतनाग जिल्ह्याच्या अधिकृत वेबसाइटनुसार, असे मानले जाते की बर्फाच्या शिवलिंगाची उंची चंद्राच्या कलांनुसार कमी-जास्त होते. श्रावण महिन्यातील ऑगस्ट महिन्याच्या पौर्णिमेला हे शिवलिंग सर्वात मोठे असते.

Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.