पुणे : संततधार पावसामुळे नाना पेठेतील साखळीपीर तालीम परिसरातील एका जुन्या वाड्याची भिंत सोमवारी दुपारी कोसळली. या दुर्घटनेत वाड्यासमोर उभ्या केलेल्या तीन दुचाकी राडारोड्याखाली दबल्या गेल्या.


साखळीपीर तालीमजवळील जुन्या वाड्याची भिंत मुसळधार पावसामुळे अचानक कोसळली. त्यावेळी वाड्यासमोर पार्क केलेल्या तीन दुचाकी भिंतीच्या ढिगाऱ्याखाली अडकल्या. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी प्रथम राडारोड्याखाली कोणी अडकलेले नाही, याची खातरजमा केली.


त्यानंतर ढिगारा हटवून त्याखाली अडकलेल्या तीनही दुचाकी बाहेर काढण्यात आल्या. या दुर्घटनेत मालमत्तेचे नुकसान झाले असून, कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती अग्निशामक दलाच्या मुख्य नियंत्रण कक्षाकडून देण्यात आली.

Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.