पुणे : शहरात संततधार पावसामुळे गेल्या चोवीस तासांत झाडे पडण्याच्या तब्बल ८३ घटनांची नोंद झाली आहे. तर गेल्या सहा दिवसांत झाडपडीच्या १६३ घटना घडल्या असून, अग्निशामक दलाने तातडीने सर्व ठिकाणी मदतकार्य केले. या घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी अथवा गंभीर दुखापत झालेली नसल्याची माहिती अग्निशामक विभागाने दिली.
सोमवारी (ता. ६) सायंकाळी पाचपर्यंत शहरातील विविध भागांत मुसळधार पावसामुळे मोठी झाडे उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या. अग्निशामक दलाच्या विविध केंद्रांतील पथकांकडून दिवसरात्र सतर्क राहून झाडे हटविणे, रस्ते वाहतुकीस मोकळे करणे आणि नागरिकांना सुरक्षितता उपलब्ध करून देण्याचे काम सुरू आहे.
घोरपडीत पिंपळाचे झाड सात-आठ घरांवर कोसळले -
घोरपडी गाव परिसरात मोठ्या पिंपळाच्या झाडाने सात ते आठ घरांवर कोसळल्याची गंभीर घटना घडली. या दुर्घटनेत घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. मात्र, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून, झाड हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी तातडीने अग्निशामक दलाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.