पुणे : महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे २०२६- २७ या शैक्षणिक वर्षात बीबीए, बीएमएस, बीबीएम, एमबीए (इंटिग्रेटेड), बीसीए आणि एमसीए (इंटिग्रेटेड) या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या केंद्रीय प्रवेशाच्या नोंदणीस सुरुवात झाली आहे. या अभ्यासक्रमांच्या प्रवेश नोंदणीसाठी १६ जुलैपर्यंत मुदत दिली आहे. यंदा पीसीएम आणि पीसीबी समूहाच्या विद्यार्थ्यांना संबंधित पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेता येणार आहे.


पीसीएम व पीसीबी समूहाची सीईटी परीक्षा दिलेल्या  विद्यार्थ्यांनाही बीबीए, बीएमएस, बीबीएम व बीसीए या अभ्यासक्रमाला प्रवेशाची संधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतला आहे. या निर्णयानुसार, प्रवेश प्रक्रियेत दिलेल्या नियमाच्या आधारावर पीसीएम आणि पीसीबी समूहाची सीईटी दिलेल्या विद्यार्थ्यांनाही या अभ्यासक्रमांना नोंदणी करता येणार आहे. जेणेकरून त्यांनाही या अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची संधी उपलब्ध आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी कक्ष) दिली आहे.  


शैक्षणिक वर्ष २०२६-२७ करिता बीबीए, बीएमएस, बीबीएम, बीसीए, एमबीए (इंटिग्रेटेड) आणि एमसीए (इंटिग्रेटेड) या अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी ऑनलाइन नोंदणी करताना कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावीत. कागदपत्रांची ‘ई-पडताळणी’ किंवा  ‘प्रत्यक्ष पडताळणी’ पद्धती सुरू केली आहे. ऑनलाइन अर्ज भरताना विद्यार्थ्याने कागदपत्रांच्या पडताळणीसाठी यापैकी कोणत्याही एका पद्धतीची निवड करावी. ‘ई-स्क्रूटिनी’ पद्धत निवडल्यास, अर्जाची पडताळणी आणि पुष्टीकरण संबंधित ‘ई-स्क्रूटिनी केंद्रा’द्वारे ऑनलाइन पद्धतीने केले जाईल. त्यामुळे उमेदवाराला यासाठी प्रत्यक्ष उपस्थित राहण्याची गरज नाही. मात्र, विद्यार्थ्याने ‘प्रत्यक्ष पडताळणी’ पद्धत निवडल्यास, त्याला/तिला जवळच्या पडताळणी केंद्र किंवा सुविधा केंद्राला प्रत्यक्ष भेट देणे आवश्यक आहे.


त्या विद्यार्थ्यांना शुल्क न देता करता येणार नोंदणी


विद्यार्थ्यांनी प्रवेशाच्या वेळापत्रकानुसार ‘www.mahacet.org’ या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करावा. बीबीए, बीएमएस, बीबीएम, बीसीए, एमबीए (इंटिग्रेटेड) आणि एमसीए (इंटिग्रेटेड) या अभ्यासक्रमांच्या सीईटीसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी नोंदणीकरिता कोणतेही शुल्क भरण्याची आवश्यकता नाही. तसेच, एनआरआय, ओसीआय, पीआयओ, आखाती देशांतील भारतीय कामगारांची मुले आणि परदेशी नागरिक असलेल्या विद्यार्थ्यांना शुल्क भरावे लागेल. एकदा भरलेले शुल्क परत केले जाणार नाही, असे सीईटी कक्षाने स्पष्ट केले आहे.


असे आहे प्रवेशाचे वेळापत्रक :


कार्यवाहीचा तपशील : कालावधी


- प्रवेशासाठी संकेतस्थळावर अर्जाची ऑनलाइन नोंदणी आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे : १६ जुलैपर्यंत


- प्रवेशाच्या अर्जाची पडताळणी आणि अर्ज निश्चिती. ई-पडताळणी/प्रत्यक्ष छाननी : ७ ते १७ जुलै


- तात्पुरती गुणवत्ता यादी संकेतस्थळावर प्रदर्शित करणे : १९ जुलै


- सर्व प्रकारच्या विद्यार्थ्यांसाठी तात्पुरत्या गुणवत्ता यादीवर तक्रारी व हरकती असल्यास सादर करणे : २० ते २२ जुलै


- अंतिम गुणवत्ता यादी संकेतस्थळावर प्रदर्शित करणे : २४ जुलै


संबंधित अभ्यासक्रमांची सीईटी दिलेल्या विद्यार्थ्यांची आकडेवारी :


अभ्यासक्रम : परीक्षेचा कालावधी : सीईटी दिलेले विद्यार्थी


- बीबीए, बीएमएस, बीबीएम, बीसीए, एमबीए (इंटिग्रेटेड), एमसीए (इंटिग्रेटेड) : २८ ते ३० एप्रिल : ६२,३०१

Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.