राजेंद्र व्यास,
गंगापूर : गंगापूर तालुक्यातील जामगाव येथे गंगापूर पोलिसांनी चार अवैध वाळूचे साठे जवळपास 400 ते 500 ब्रश अंदाजे 12 ते 15 लाख रुपये ची वाळू जप्त केले आहे. गंगापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष झोरे यांना गुप्त खबरे मार्फत माहिती मिळाली की जामगाव ता. गंगापूर येथील सहकारी साखर कारखान्याचे मागे असलेल्या गायरानामध्ये अवैध वाळूचे मोठ्या प्रमाणात साठवणूक करून ठेवण्यात आले आहे.
यावरून सोमवार (ता.६) रोजी रात्री एक वाजता पोलीस निरीक्षक सलीम चाऊस यांच्या सह त्यांच्या पथकाने या गायरान परिसरात पाहणी केली असता त्यांना जवळपास चार मोठमोठे ढीग अवैध वाळूचा उपसा करून साठवणूक केलेले आढळून आले. यावरून सोमवारी सकाळी पोलिसांनी त्या ठिकाणी छापा मारून ही वाळू जप्त केली आहे.
या वाळूची पुढील कारवाई गंगापूर तहसील विभागाकडे देण्यात आले आहे. ही वाळू अंदाजे 400 ते 500 ब्रास असल्याची शक्यता असून त्याची किंमत बारा ते पंधरा लाख रुपये इतकी आहे. असल्याची शक्यता गंगापूर पोलिसांनी व्यक्त केली आहे.
परंतु याविषयी गंगापूरच्या महसूल प्रशासनाकडे विचारपूस केले असता त्यांनी उडवा उडवी चे उत्तरे दिले असून पंचनामा करून कुठलीही माहिती देण्यास ते टाळाटाळ करीत आहे. याविषयीचे दैनिक सकाळ मधून जामगाव परिसरातून कुठे आहे तलाठी ही मालिका प्रसिद्ध झाली होती. याविषयीची संपूर्ण उल्लेख या मालिकेत करण्यात आला होता. परंतु अद्यापही मोठमोठे डिग असतानाही गावच्या तलाठ्यांना व मंडळ निरीक्षकाला यांना माहिती कशी नाही ही मोठी आश्चर्याची गोष्ट आहे. आता या मिळालेल्या मोठ्या साठ्यामुळे यांच्यावर कारवाई होणार का याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.
याप्रकरणी गंगापूरचे आमदार प्रशांत बंब या अवैध वाळूचे रॅकेट विधानसभेत सहपुराव्यानिशी मांडले होते. यात मोठ्या प्रमाणात तत्कालीन पोलीस निरीक्षक कुमार सिंग राठोड व तहसीलदार नवनाथ वगवाड व त्यांचे संबंधित अधिकारी शामील असल्याचे त्यांनी सहपुराव्यानिशी मांडले होते. त्यात पोलीस निरीक्षकांचे तडका फडके बदली झाली आहे. या दोघांची अँटी करप्शन मार्फत चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली होती.
याप्रकरणी अवैध वाळूचा उपसा करण्या विरोधात महसूल प्रशासनाने या अज्ञात वाळूचा साठा करणाऱ्यांचे विरोधात कुठलाही तक्रार दाखल केलेली नव्हती.
गंगापूर पोलीस ठाणे हद्दीतील ज्या ज्या ठिकाणी वाळूचे अवयव साठे असतील त्याची माहिती घेऊन त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. ज्या ठिकाणी वाळू साठा आहे याची माहिती गंगापूर पोलिसांना द्यावी त्याचे नाव गुप्त ठेवले जाईल पोलीस प्रशांत सणस सहकार्य करावे.
सलीम चाऊस, पोलीस निरीक्षक,गंगापूर.
गंगापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात गौण खनिजाचा अवैध उपसा झालेला आहे. सर्वसामान्यांच्या घरकुलासाठी महसूल प्रशासनामार्फत वाळू उपलब्ध करून दिली जात नाही. परंतु तहसीलदार व त्या त्या भागातील तलाठी मंडळ निरीक्षक यांच्या आशीर्वादाने मोठ्या प्रमाणात वाळू माफियांनी वाळूचा उपसा करून ठेवलेला आहे.यात तहसीलदारांचा मोठा सहभाग असून ज्या भागात अवैध वाळूचा साठा सापडेल त्या ठिकाणच्या तलाठी व मंडल निरीक्षकाच्या जबाबदार धरून त्यांना तातडीने निलंबित करावे व याला सर्वस्वी जबाबदार तहसीलदारांना धरण्यात यावी.
प्रशांत बंब, आमदार,गंगापूर.
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.