• पालघर जिल्ह्यासाठी हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे.


  • मुसळधार पावसाच्या शक्यतेमुळे सर्व अंगणवाड्या, शाळा आणि महाविद्यालयांना उद्याही सुट्टी जाहीर करण्यात आली.


  • जिल्हा प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा निर्णय घेतला आहे.



राज्यात गेल्या दोन ते दिवसापासून मुसळधार पाऊस होत आहे. आज मुंबईसह अनेक शहरांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. आता हवामान विभागाने पालघर जिल्ह्यासाठी पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे. याच कारणामुळे जिल्हा प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना उद्याही सुट्टी जाहीर करण्यात आलीय.

मोठी बातमी! किल्ले, धरणं, धबधबे सर्व पर्यटकस्थळं बंद; ठाणे प्रशासनाचा मोठा निर्णय

पालघरमध्येउद्या पावसाचा यलो अलर्ट देण्यात आलाय. उद्यादेखील जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. खबरदारी म्हणून जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्या, शाळा आणि महाविद्यालयांना सु्ट्टी देण्याचा निर्णय घेतलाय. प्रादेशिक हवामान विभागाच्या पूर्वसूचनेवरून जिल्ह्यातील त्या-त्या भागातील स्थानिक परिस्थितीचा आढावा घेवून, संपूर्ण जिल्ह्याकरिता अथवा जिल्ह्यातील स्थानिक क्षेत्रातील शाळांना सुट्टी जाहिर करण्याचे अधिकार सक्षम प्राधिकारी यांना प्रदान करण्यात आले आहेत.

फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; जिल्हाधिकाऱ्यांसह बड्या अधिकार्‍यांचे अधिकार बदलले

आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 मधील कलम 25 अन्वये जिल्हाधिकारी हे आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष आहेत व संदर्भ क. 2 कडील शासन परिपत्रकानुसार शाळांना सुट्टी जाहिर करण्याचे अधिकार संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकारीयांना प्रदान करण्यात आलेले आहेत.

Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.