विरार - वसई विरार मध्ये गेल्या तीन दिवसापासून सुरु असलेल्या मुसळधार पावसाचा लागोपाठ दुसऱ्या दिवशीही पश्चिम रेल्वेला फटका बसला असून ,वसई ते विरार दरम्यानची लोकसेवा पुन्हा ठप्प झाली आहे. तर दुसऱ्या बाजूला वसई ते विरार दरम्यान जाण्यासाठी ट्रॅक्टरवाले ५०० रुपये आकारत असल्याने प्रवाश्याना दोन्ही बाजूने भुर्दड सोसावा लागत आहे. तीन दिवसापासून शहरात अनेक ठिकाणी पाणी भरल्याने वीज पुरवठा आणि इंटरनेट सेवा बंद झाली आहे.


मुसळधार पावसाचा फटका सद्या वसई तालुक्याला बसत आहे. वसई ,नालासोपारा, विरार आणि नायगाव दरम्यान अनेक ठिकाणी पाणी भरल्याने अनेक घरे ,दुकाने, कारखाने पाण्याखाली गेली आहेत. सनसिटीच्या स्विचिंग सेन्टर मध्ये पूर्ण पाणी भरल्याने तालुक्यातील जवळपास ७० टक्के वीज गायब झाली आहे. त्याच बरोबर इंटरनेट सेवा हि बंद असल्याने त्याचा परिणाम संपर्क साधण्यावर होत आहे.



काल मुसळधार पावसामुळे वसई,नालासोपारा आणि विरार दरम्यानचे रेल्वे ट्रक पाण्याखाली गेल्याने त्याचा परिणाम रेल्वे सेवेवर झाला होता. आज हि पावसाचा जोर असल्याने सकाळ पासूनच रेल्वे वाहतुकीवर त्याचा परिणाम होत होता. संद्याकाळी ५ वाजे पर्यंत एखाद दुसरी लोकल येत जात होती. परंतु ५ नंतर मात्र रेल्वे ट्रॅकवर पाणी पुन्हा जमा झाल्याने जवळपास २ तास वसई ते विरार दरम्यानची वाहतूक बंद होती.


साडेसात नंतर ट्रॅकवरील पाणी पाळहून एखाद दुसरी लोकल विरार पर्यंत जात होती . लोकल बंद पडल्याने आणि ठिकठिकाणी पाणी भरल्याने सर्व वाहने बंद असल्याने ट्रॅक्टर वाल्याना सुगीचे दिवस आले असून विरार पर्यंत एका प्रवाश्याला सोडण्यासाठी ५०० रुपये आकारले जात असल्याचे समोर आले आहे.


आजही अनेक भागात पाणी असल्याने स्थानिक नगरसेवक आणि स्वयंसेवि संस्था पाण्यात अडकलेल्याना खाण्याची व्यवस्था करताना दिसत आहेत. ज्यांना ट्रॅक्टरचे भाडे परवडत नाही ते रेल्वे ट्रॅकवरून चालत जाणे पसंद करत असल्याने ट्रॅकवर चालणाऱ्यांची गर्दी दिसत होती. वसई पश्चिम, तसेच पूर्वपट्टीतील मिठागर, वाळिव, एव्ह्र्षीं, वसंत नगरी, जूचंद्र, मला, नालासोपारा पूर्व आणि पश्चिम तसेच विरार पूर्व व पश्चिमेला आजही पाणी भरलेले असल्याने नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.

Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.