वेल्हे : राजगड तालुक्यातील पासली केळद खिंडीतील खचलेला रस्ता सोमवार (ता.०६) रोजी रात्रभर कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात खचला असून सुमारे 15 फूट उंचीच्या भेगा पडून सुमारे 600 मीटर पर्यंत लांब गेल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासनाने कालच रस्ता बंद केला असून मंगळवार (ता.07) रोजी प्रशासकीय अधिकाऱ्यांसह तालुक्यातील लोकप्रतिनिधींनी पाहणी केली.
राजगड तालुक्यातील पर्यटनासाठी महत्त्वाचे ठिकाण असणाऱ्या मढेघाट येथील प्रसिद्ध लक्ष्मी धबधब्याकडे जाणारा जाणारा मार्ग पूर्णतः खचला असल्याने या रस्त्यावरून साधी दुचाकी सुद्धा जाण्या योग्य मार्ग राहिला नसून पर्यटनाला पूर्णता खिळ बसणार असल्याने कित्येक कुटुंबावर उपासमारीची वेळ येणार आहे.
या परिसरातील 13 गावांना मूलभूत सुविधा पोहोचवण्यासाठी प्रशासनास मोठ्या अडचणींना सामना करावा लागणार आहे. कालपर्यंत दोन फुटाची आडवी भेग असलेल्या रस्त्यास रात्रभर कोसळत असलेल्या पावसामुळे सकाळी सुमारे 600 मीटर लांबीचे रस्त्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले . सुमारे 100 फूट लांब रस्ता पंधरा फूट उंचीच्या भेगा पडल्याने अक्षरशा खचल्याने व या मार्गावरून वाहतूक पूर्णपणे थांबल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
घटनेचे गांभीर्य ओळखून या ठिकाणास भोरचे उपविभागीय अधिकारी डॉ. विकास खरात, तहसीलदार निवास ढाणे, गटविकास अधिकारी संजय ढमाळ, जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती अमोल नलावडे ,जिल्हा परिषद सदस्य तानाजी मांगडे ,पंचायत समितीचे उपसभापती संदीप खुटवड, पंचायत समिती सदस्य सीता नंदकुमार खुळे, नायब तहसीलदार मयूर बनसोडे यांच्यासह पीडब्ल्यूडी च्या अधिकाऱ्यांनी भेट दिली परिसराची पाहणी करून रस्त्याच्या दोन्ही बाजूला रस्ता वाहतुकीस बंद असल्याचे फलक लावून बॅरिकेट लावण्यात आले आहेत.
या परिसरामध्ये अनेक वर्षांपासून मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असताना रस्त्यांची अशाप्रकारची दुरावस्था कधीच झाली नाही तर एवढ्या मोठ्या प्रमाणात रस्त्यास भेगा कशा पडल्या असा प्रश्न नागरिकांना उपस्थित झाल्यानंतर पंचायत समितीचे उपसभापती संदीप खुटवड यांनी या हा नक्की प्रकार काय आहे हा जनतेसमोर येण्यासाठी भू-वैज्ञानिकांकडून पाहणी करण्याची मागणी केली आहे.
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.