जर तुम्ही प्रेग्नंट असाल आणि मेकअपचे शौकीन असाल तर वेळीच सावध व्हा. कारण ऑल इंडीया इंस्टीट्यूट ऑफ मेडीकल सायन्सच्या AIIMS संशोधनात एक धक्कादायक गोष्ट समोर आली आहे. त्यानुसार सामान्य महिलांच्या तुलनेत प्रेग्नंट महिलांच्या शरीरात घातक रसायनांचे प्रमाण वाढत असून त्याचा दुष्परिणाम हार्मोन्सच्या कार्यावर होत आहे. त्यामुळे महिलेबरोबरच तिच्या गर्भात वाढणाऱ्या बाळावरही त्याचे गंभीर परिणाम होण्याची शक्यता AIIMSच्या संशोधकांनी व्यक्त केली आहे.


या संशोधनासाठी एम्सतर्फे ६४१ सामान्य गर्भवती महिलांचे युरिन सँम्पल तपासले गेले. त्यात त्यांच्या शरीरात मिथाइलपैराबेन नावाच्या रसायनाचे प्रमाण अधिक असल्याचे निदर्शनास आले. या रसायनाचा वापर पदार्थ टिकवण्यासाठी केला जातो. प्रामुख्याने या रसायनाचा वापर कॉस्मेटीक्स, स्किन केयर प्रॉडक्ट्स, लोशन,शँम्पू आणि अशा अनेक पर्सनल केयर उत्पादनांमध्ये केला जातो.
तसेच मिथाइलपैराबेन या रसायनाबरोबरच महिलांच्या शरीरात मोनोएथाइल फ्थेलेट हे रसायनाचे प्रमाणही अधिक असल्याचे समोर आले. हे रसायन प्लास्टीकपासून बनवलेल्या उत्पादनांमध्ये वापरले जाते. तसेच सिथेंटीक सुगंध असलेल्या वस्तू बनवण्यासाठीही मोनोएथाइल फ्थेलेटचा वापर केला जातो. तज्त्रानुसार मिथाइलपैराबेन आणि मोनोएथाइल फ्थेलेट या दोन्ही रसायनांचा समावेश एंडोक्राइन-डिसरप्टिंग या रसायनांच्या श्रेणींमध्ये होतो. ज्यामुळे हार्मोन्स प्रभावित होतात.


या रसायनांचा परिणाम गर्भाच्या वाढीवर होऊ शकतो. त्यामुळे गर्भवती महिलांनी कॉस्मेटीक आणि प्ला्स्टीकचा वापरा करणे टाळावे असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.











Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.