उल्हासनगर : ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर येथे मोठी दुर्घटना घडली आहे. महावितरणचे काम करत असताना विजेचा जोरदार धक्का लागून वायरमनचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे सहकाऱ्यांसह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. तसेच मृत व्यक्तीच्या कुटुंबावर मोठे संकट ओढवले असून पीडित कुटुंबाला ५० लाखांच्या मदतीची मागणी समाजातून केली जात आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, उल्हासनगरयेथे महावितरणचे काम करत असताना विजेच्या धक्क्याने वायरमन दीपक शेळके यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. महावितरणच्या सूचनेनुसार ते म्हारळ परिसरात कामासाठी गेले असताना ही दुर्घटना घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच तातडीने मृतदेह मध्यवर्ती रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आला. तसेच घटनेची माहिती कुटुंबियांना देण्यात आली. यावेळी व्यक्तीच्या कुटुंबीय तसेच इतर नागरिकांनी रुग्णालयात गर्दी केली.

Mumbai Local: वसई-विरारमधील रेल्वे रुळ ४०० मिमी उंचावणार; पावसाळ्यातील जलसंकटावर पश्चिम रेल्वेचा कायमस्वरूपी उपाय

दरम्यान, या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ पसरली असून पीडित कुटुंबाला तातडीने ५० लाख रुपयांची आर्थिक मदत आणि कुटुंबातील एका सदस्याला नोकरी देण्याची जोरदार मागणी समाजातून करण्यात येत आहे. या घटनेप्रकरणी महावितरणप्रशासन काय भूमिका घेणार, हे पाहणं महत्त्वाचे असणार आहे.

Mumbai Pune Railway : मुंबई-पुणे रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! मुसळधार पावसामुळे एक्स्प्रेस रद्द, कोणत्या आणि कधीपर्यंत? जनावरांना पाणी देण्यासाठी गेलेल्या तरुणाचा शॉक लागून मृत्यू

पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील सविंदणे येथे शेतातील विद्युत कृषी पंप सुरू करण्यासाठी गेलेल्या एका तरुणाचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. गणेश भाऊसाहेब भोर (वय १८) असे तरुणाचे नाव असून बुधवारी सायंकाळी जनावरांना पाणी नसल्याने गणेश पाण्याची टाकी भरण्यासाठी कृषी पंप सुरू करून येतो, असे सांगून घरातून निघाला. मात्र बराच वेळ उलटूनही तो घरी परतला नाही. त्यामुळे कुटुंबीयांनी त्याचा शोध सुरू केला. त्याचे वडील शेतात गेले असता कृषी पंपाच्या विद्युत पेटीजवळ गणेश पडलेला दिसला. तसेच यावेळी पंपाचा विद्युत बॉक्स उघडा असल्याचेही निदर्शनास आले. गणेशला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, मात्र त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.