T20 Madness: Dumbleton CC Score 417-2, Openers Double Ton : ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये गोलंदाजांना काही किंमत राहिलेली नाही, हे पुन्हा एकदा दिसून आले... आतापर्यंत ट्वेंटी-२०त २००, २५०, ३०० धावा होत होत्या, परंतु आता तोही टप्पा ओलांडला गेलाय. डम्बलटन क्रिकेट क्लबने Varistha Cheltenham Premier T20मध्ये हॅदरले अँड रेडिंग्ज सीसी विरुद्ध आपल्या २० षटकांत ४१७ धावा कुटत इतिहास रचला आणि हा सामना १८८ धावांच्या फरकाने जिंकला.


सलामीवीर इवान गेगने ( Ewan Gegg) ५४ चेंडूंत द्विशतक झळकावले, तर संघाने एकूण ४७ षटकार खेचले. डम्बलटननेआपल्या घरच्या मैदानावर २० षटकांत ४१७ धावा ठोकून इतिहास रचला. सलामीवीर थॉमस केली आणि इवान गेग यांनी अवघ्या ६.१ षटकांत ११२ धावा जोडल्या, ज्यात केलीने केवळ २५ चेंडूंमध्ये ६४ धावा ठोकल्या. मात्र, अवघ्या ५४ चेंडूंमध्ये शानदार द्विशतक झळकावून गेगने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तो ५५ चेंडूंमध्ये १३ चौकार आणि तब्बल २३ षटकारांसह २०६ धावांवर नाबाद राहिला.

Video : १५ चेंडूंत ७० धावा अन् शतक! वैभव सूर्यवंशीच्या 'भीडू'ची दहशत; २० वर्षीय पोरानं Mumbai Indians च्या संघाला दिला चोप

सातव्या षटकात फलंदाजीला आलेल्या डॅन हॉलंडनेही कोणतीही कसर सोडली नाही आणि ३७ चेंडूंमध्ये १२२ धावा ठोकल्या. खेळपट्टीवर ४१ मिनिटे खेळताना त्याने १६ षटकार आणि चार चौकारही ठोकले.गेग आणि हॉलंड यांनी अवघ्या ५९ चेंडूंमध्ये २११ धावांची भागीदारी केली. गेगने नाट्यमयरित्या वेग वाढवला आणि शेवटच्या २४ पैकी १९ चेंडूंचा सामना करत आपल्या संघाला ४०० धावांच्या पुढे नेले. डम्बलटनने आपल्या डावात २२ चौकार आणि ४७ षटकार ठोकत चौकारांच्या जोरावर तब्बल ३७० धावा जमवल्या.



धावांचा पाठलाग करताना २१ धावांचा आवश्यक दर असल्याने, हॅदरले अँड रेडिंग्जच्या फलंदाजांना प्रत्येक चेंडूवर प्रहार करण्याशिवाय पर्याय नव्हता. त्यांनी आपल्या डावाच्या शेवटच्या षटकात सर्वबाद होण्यापूर्वी २२९ धावा करून चांगली कामगिरी केली. सलामीवीर हॅरी ब्लूमफिल्डने ४८ चेंडूंमध्ये सहा चौकार आणि १२ षटकारांसह १०९ धावा केल्या. हॅदरले आणि रेडिंग्स यांनी १९ षटकार ठोकून सामन्यातील एकूण षटकारांची संख्या ६६ वर नेली. गेगने सामन्यातील शेवटची विकेट घेतली आणि डम्बलटनने १८८ धावांनी मोठा विजय नोंदवला.

Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.