► वृत्तसंस्था नवी दिल्ली
भारतीय जनता पक्षात लवकरच आणखी भर पडणार आहे. आम आदमी पक्षातून एक वर्षभरापूर्वी बाहेर पडलेला एक गट या पक्षात विलीन होणार आहे. हा गट ‘इंद्रप्रस्थ विकास पक्ष’ म्हणून परिचित आहे. दिल्लीत 2025 मध्ये विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाचा पराभव झाला होता. त्यानंतर दिल्ली महानगरपालिकेतील या पक्षाच्या 16 नगरसेवकांचा एक गट आम आदमी पक्षातून बाहेर पडला.
भारतीय जनता पक्षात समाविष्ट होणार आहे.
भारतीय जनता पक्षाने या विलीनीकरणाला मान्यता दिली आहे. हा गट लवकरच दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात विलाrन होणार आहे. भारतीय जनता पक्ष हा विकास घडवून आणणारा पक्ष असल्याने आम्ही या पक्षासमवेत विलीन होणार आहोत, असे या गटाच्या नेत्यांनी स्पष्ट केले आहे. दिल्लीचा विकास वेगाने होत आहे. आम्हीही या विकासाशी आम्हाला जोडून घेऊ इच्छित आहोत. आमच्या प्रभागांचाही विकास या विलीनीकरणामुळे चांगल्या प्रकारे होईल, अशी अपेक्षा आहे. जनतेच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आम्ही या पक्षात समाविष्ट होत आहोत, असे प्रतिपादन त्यांनी केले.
वरीष्ठ नेत्यांमध्ये चर्चा
भारतीय जनता पक्ष आणि इंद्रप्रस्थ विकास पक्ष या दोन्ही पक्षांच्या उच्च पातळीवरील नेत्यांनी या विलीनीकरणासंदर्भात सविस्तर चर्चा केली आहे. दोन्ही पक्षांच्या नेत्यांची या विलीनीकरणाला मान्यता आहे. या विलीनीकरणाचे परिणाम भविष्यकाळात काय आणि कसे होतील, याविषयीही विचार विमर्श झाला आहे. त्यानंतरच निर्णयाला अंतिम रुप देण्यात आले आहे, अशी माहिती देण्यात आली.
विभागीय समित्यांमध्ये समावेश
भारतीय जनता पक्षात विलींनीकरण झाल्यानंतर या नगरसेवकांची नियुक्ती दिल्ली महानगरपालिकेच्या विविध विभागीय समित्यांवर केली जाणार आहे. तसेच काही ज्येष्ठ नगरसेवकांचा समावेश महानगरपालिकेच्या स्थायी समितीतही केला जाणार आहे. दिल्ली महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या सहा जागा सध्या रिक्त आहेत. या जागांसाठी 15 जुलैला निवडणूक होणार आहे. 12 विभागीय समित्यांचे अध्यक्ष आणि उपाध्यक्षही निवडणुकीच्या माध्यमातून निवडले जाणार आहेत.
भाजपचे बहुमत होणार
दिल्ली महानगरपालिकेच्या एकंदर 250 जागा आहेत. त्यांच्यापैकी 123 जागा भारतीय जनता पक्षाकडे आहेत. आम आदमी पक्षाच्या 100 जागा असून काँग्रेसच्या 9 आहेत. आता मूळचे आम आदमी पक्षाचे असणारे 16 नगरसेवक भारतीय जनता पक्षात समाविष्ट होणार असल्याने या पक्षाचे बहुमत होणार आहे.
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.