Supreme Court: सुप्रीम कोर्टात शुक्रवारी सुनावणी दरम्यान अत्यंत लाजीरवाणा प्रकार घडला. एका याचिकाकर्त्यानं कोर्टारुममध्ये अचानक गोंधळ घालायला सुरुवात केली. त्यानं सरन्यायाधिशांना शिवीगाळही केली. यानंतर कोर्टाच्या आदेशानं सुरक्षा रक्षकांनी त्याला तातडीनं ताब्यात घेतलं. या व्यक्तीनं न्यायमूर्तींसमोर स्वतःची बाजू मांडताना हा प्रकार घडला. या प्रकाराचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे.
SIRच्या वर्कलोडमुळं आणखी एका शिक्षकाचा जीवन संपवण्याचा प्रयत्न! निवडणूक आयोगाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह?सुप्रीम कोर्टात न्या. के. व्ही. विश्वनाथन, न्या. आलोक अराधे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी दरम्यान हा प्रकार घडला. कोर्टाची सुनावणी आता लाईव्ह सुरु असते त्या लाईव्ह व्हिडिओची क्लीप आता सोशल मीडियात व्हायरल झाली आहे. या सुनावणीदरम्यान याचिकाकर्ता व्यक्तीनं कोणताही वकील नेमला नव्हता. स्वतःच कोर्टासमोर आपली बाजू मांडत असताना त्यानं स्वतःचा उल्लेख सार्वभौम असा करताना न्यायमूर्तींनाच आपण आदेश देत असल्याचं म्हटलं आहे.
Thaimaman Scheme : CM विजय यांची मोठी घोषणा! सरकारी रुग्णालयात बाळ जन्मल्यास आईला सोन्याची अंगठी भेट; 'थाईमामम स्कीम' नेमकी काय?तसंच आपल्या फाईलमधून आपला मुद्दा सांगत असताना अचानक त्यानं फाईलमधील सर्व कागद भर कोर्टात भिरकावले. त्यानंतर त्यानं थेट सरन्यायाधीशांचं नाव घेत त्यांना सर्वांसमोर शिवीगाळही केली. हा संपूर्ण प्रकार घडत असताना खंडपीठाचे दोन्ही न्यायमूर्ती स्तब्ध होऊन त्या व्यक्तीकडं पाहतच राहिले. पण त्यानंतर त्याच्या बेजबाबदार कृत्याची गंभीर दखल घेत तत्काळ सुरक्षेसंदर्भात अधिकाऱ्यांना कडक पाऊल उचलण्याचे निर्देशही दिले. तसंच त्याला तातडीनं ताब्यात घेण्याचे आदेश पोलिसांना दिले.
Shivsena UBT : ठाकरेंचे नगरसेवक फोडायला नेमले एजंट! दिली जातेय ५ कोटींची ऑफर; शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याचे धक्कादायक आरोपयानंतर कोर्टाच्या सुरक्षा रक्षकांनी तातडीनं त्याला पकडलं आणि कोर्टरुमच्या बाहेर घेऊन गेले. त्यानंतर तात्काळ कोर्टाबाहेर दिल्ली पोलीस आले आणि त्यांनी या व्यक्तीला ताब्यात घेतलं. ही संपूर्ण घटना शुकवारी सकाळी ११ वाजता घडली. हा दिवस सुप्रीम कोर्टाच्या अंशकालीन कामकाजाचा शेवटचा दिवस होता. कोर्टाचे उन्हाळी सुट्टीचे ५० दिवस आज पूर्ण झाले. यानंतर सोमवारपासून देशातील सर्व कोर्टांमध्ये सर्वसामान्य दिवसांप्रमाणं नियमित कामकाज पुन्हा सुरु होईल.
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.