वास्तुशास्त्रामध्ये केवळ तुमच्या घराची रचना कशी असावी? घराचा मुख्य दरवाजा कोणत्या दिशेला असावा किंवा स्वयंपाक घर आणि बेडरूम कोणत्या दिशेला असावी? एवढीच माहिती देण्यात आलेली नाहीये. तर वास्तुशास्त्रामध्ये तुमच्या घरात कोणत्या वस्तू असाव्यात? आणि कोणत्या वस्तू नसाव्यात? ज्या वस्तू तुमच्या घरात आहेत, त्यांची दिशा कोणती असावी? जर त्या वस्तू ठेवण्याची दिशा चुकली तर काय परिणाम होऊ शकतात? याची माहिती देखील देण्यात आली आहे. वास्तुशास्त्रानुसार तुमच्या घरातील बाथरूम हा घरातील नकारात्मक ऊर्जेचा सर्वात मोठा स्त्रोत असतो. त्यामुळे काही गोष्टी या बाथरूमध्ये ठेवणं कटाक्षाने टाळलं पाहिजे, आज आपण अशाच काही गोष्टींबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.
तुटलेला आरसा – अनेकांना बाथरूममध्ये आरसा लावण्याची सवय असते. परंतु बाथरूममध्ये आरसा लावताना एक काळजी घ्यावी बाथरूममध्ये कधीही तुटलेला आरसा असू नये, कारण बाथरूममधून सातत्याने नकारात्म ऊर्जा प्रवाहित होत असते, आणि तुटलेल्या आरशामधून देखील नकारात्मक ऊर्जा प्रवाहित होते, त्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जेच प्रवाह वाढतो.
ओले कपडे – वास्तुशास्त्रानुसार बाथरूममध्ये कधीही ओले कपडे ठेवू नये, यामुळे घरात नकारात्मक प्रभाव निर्माण होतो, ज्याचा परिणाम हा तुमच्या आर्थिक स्थितीवर होऊ शकतो, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.
रिकाम्या बादल्या – वास्तुशास्त्रानुसार बाथरूममध्ये कधीही रिकाम्या बादल्या ठेवू नये, बाथरूममध्ये बादल्या या नेहमी पाण्यानं भरून ठेवाव्यात कारण जेव्हा बादली पाण्याने भरलेली असते, तेव्हा ती घरातील नकारात्मक प्रभाव कमी करण्यास मदत करते.
औषधे – बाथरूममध्ये कोणत्याही प्रकारची औषधी ठेवू नये, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे, कारण त्यामुळे तुमच्या घरात आजारपण वाढू शकतं.
टॉवेल – अनेकांना बाथरूममध्ये टॉवेल ठेवण्याची सवय असते, परंतु वास्तुशास्त्रानुसार बाथरूममध्ये कधीही टॉवेल ठेवू नये, असं वास्तुशास्त्रात सांगितलं आहे.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.