वेस्ट इंडिजचे मुख्य प्रशिक्षक डॅरेन सॅमीने संघातील स्टार अष्टपैलूच्या निवृत्तीबाबत खुलासा केला आहे. विस्डेन क्रिकेट पॉडकास्ट दरम्यान सॅमीने जेसन होल्डरच्या वनडे (एकदिवसीय) क्रिकेटमधून निवृत्तीची पुष्टी केली आहे.


होल्डरने १ फेब्रुवारी २०१३ रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडेमध्ये पदार्पण केले होते. या फॉरमॅटचा शेवटचा सामना त्याने २०२३ मध्ये खेळला होता.


होल्डर अजूनही कसोटी संघात स्थान मिळवण्याच्या शर्यतीत आहे. मला माहित आहे की त्याने वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे, मात्र तो कसोटी क्रिकेटसाठी निश्चितपणे उपलब्ध आहे. त्यामध्ये त्याने रस दाखवला असून तो आमचा मुख्य अष्टपैलू खेळाडू आहे, असे सॅमीने म्हटले आहे.









होल्डरची वनडे कारकिर्द
होल्डरने २०१३ मध्ये वनडेमध्ये पदार्पण करताना २०२३ मध्ये शेवटचा वनडे सामना खेळला. या १० वर्षांच्या कारकिर्दीत त्याने १३८ सामने खेळले. त्यामधील ११४ डावांमध्ये त्याने २४.८५ च्या सरासरीने आणि ९०.२३ च्या स्ट्राईक रेटने २२३७ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने १२ अर्धशतके झळकावली आहेत. ९९ धावांवर नाबाद ही त्याची वनडेतील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या आहे.


भारताविरुद्ध गोलंदाजीत सर्वोत्तम कामगिरी
होल्डरने गोलंदाजीतही प्रभावी कामगिरी केली आहे. त्याने १३४ डावांमध्ये १५९ विकेट्स घेतल्या आहेत. यामध्ये त्याची सरासरी ३६.९६ आणि इकॉनॉमी रेट ५.५० राहिला आहे. यामध्ये त्याची सर्वोत्तम कामगिरी भारताविरुद्ध आली. त्याने २०१७ मध्ये ९.४ षटकांत २७ धावा देत ५ विकेट्स घेतल्या होत्या.


होल्डरने दोनदा ५ विकेट्स आणि ५ वेळा ४ विकेट्स घेण्याची कामगिरी केली आहे.


विंडीजच्या या अनुभवी खेळाडूने क्षेत्ररक्षणातही उत्तम कामगिरी केली. त्याने ६५ झेल घेतले. तसेच त्याने ८६ वनडे सामन्यांमध्ये संघाचे नेतृत्वही केले आहे. त्याच्या कर्णधारपदाच्या कार्यकाळात विंडीजने २४ वनडे सामने जिंकले. (West Indies head coach Daren Sammy confirms that Holder has retired from ODIs)




Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.