बिहारच्या हाजीपूरमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या दौऱ्यादरम्यान एक अनपेक्षित घटना घडली आहे. यावेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री विजय चौधरी यांना घेऊन निघालेल्या हेलिकॉप्टरने उड्डाण घेतल्यानंतर काही मिनिटे हवेतच एका ठिकाणी घिरट्या घातल्या. त्यामुळे उपस्थितांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले. काही काळासाठी हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाला की काय, अशी चर्चा रंगली होती. मात्र, काही मिनिटांनंतर हेलिकॉप्टरने पुन्हा नियोजित मार्गाने उड्डाण सुरू केल्याने सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
सम्राट चौधरी आणि उपमुख्यमंत्री विजय चौधरी हे हाजीपूर येथे पेपरलेस नोंदणी कार्यालयाच्या उद्घाटनासाठी आले होते. कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडल्यानंतर दोन्ही नेते हेलिकॉप्टरने रवाना झाले. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, हेलिकॉप्टरने सुमारे १५० फूट उंची गाठली होती. मात्र, त्यानंतर पुढे जाण्याऐवजी ते जवळपास चार मिनिटे त्याच परिसरात फिरत राहिले. काही वेळ हेलिकॉप्टरची दिशा बदलल्याचेही दिसून आले. त्यामुळे हेलिकॉप्टर पुन्हा हेलिपॅडवर उतरणार असल्याची शक्यता उपस्थितांकडून व्यक्त करण्यात आली.
मुख्यमंत्री थोडक्यात बचावले, उड्डाण घेताच मागे जाऊ लागलं हेलिकॉप्टर, मोठी दुर्घटना टळली!घटनेची माहिती मिळताच सुरक्षा यंत्रणा आणि प्रशासन सतर्क झाले. हेलिपॅड परिसरातील हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवण्यात आले. मात्र, काही मिनिटांनंतर हेलिकॉप्टरने स्थिर उड्डाण घेत हाजीपूरहून पुढील प्रवास सुरू केला. प्राथमिक माहितीनुसार, कोणताही तांत्रिक बिघाड नसून हवाई मार्गासाठी आवश्यक असलेली रूट क्लिअरन्स मिळण्यास विलंब झाल्याचे सांगितले जात आहे. संबंधित यंत्रणेकडून मार्ग मोकळा असल्याची पुष्टी मिळाल्यानंतरच हेलिकॉप्टरला पुढे जाण्याची परवानगी देण्यात आली.
Eknath Shinde: वादळामुळे एकनाथ शिंदेंचे हेलिकॉप्टर हवेतच अडकले; जुहू विमानतळावर थरारक लँडिंग, पाहा व्हिडिओदरम्यान, मुख्यमंत्री झाल्यानंतर सम्राट चौधरी यांचा हाजीपूरमधील हा पहिलाच अधिकृत दौरा होता. त्यांच्या स्वागतासाठी एनडीएचे नेते, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या दौऱ्यात त्यांनी जिल्हा नोंदणी कार्यालयात पेपरलेस नोंदणी प्रणालीसह विविध डिजिटल उपक्रमांचे उद्घाटन केले. प्रशासनात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवून नागरिकांना अधिक जलद, पारदर्शक आणि सुलभ सेवा देण्यावर सरकारचा भर असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.