-मनोज कुंभार


वेल्हे: शिरकोली (ता.वेल्हे) येथील हॅपीलॅन्ड हॉटेलमध्ये केअरटेकर म्हणून काम करणाऱ्या २४ वर्षीय तरुणाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवार(ता.११) रोजी उघडकीस आली आहे. कामावर गेल्यानंतर घरी न परतलेल्या तरुणाचा शोध घेत असताना तो महावितरणच्या डीपीजवळ बेशुद्ध अवस्थेत आढळून आला. ग्रामीण रुग्णालयात नेल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

Milk Rate: दूध उत्पादकांना दिलासा! गायीच्या दुधाचा दर ४१ रुपयांवर; तुकाराम मुंढे इफेक्ट, राज्यातील संकलनात २० लाख लिटरची घट

प्रकाश कोंडिबा ढेबे (वय २४,रा.शिरकोली,ढेबे वस्ती, ता. वेल्हे) असे मृत तरुणाचे नाव असून घटनेचे गांभीर्य ओळखून राजगड तालुक्याचे तहसीलदार निवास ढाणे यांनी घटनास्थळाची पाहणी केली आहे. याप्रकरणी चुलते दत्तात्रय आबाजी ढेबे,व्यवसाय शेती सध्या राहणार ,वारजे माळवाडी,(पुणे) मुळगाव शिरकोली ता.राजगड यांनी वेल्हे पोलीस ठाण्यात खबर दिली आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रकाश हा शिरकोली येथील हॅपीलॅन्ड हॉटेलमध्ये केअरटेकर म्हणून कार्यरत होता. प्रकाश हा शुक्रवार १० जुलै रोजी सकाळी सुमारे ११ वाजता कामावर गेला होता. मात्र, रात्री उशिरापर्यंत तो घरी परतला नाही.\


शनिवारी सकाळी कुटुंबीयांनी त्याचा शोध घेत हॉटेल परिसरात गेल्यानंतर प्रकाश हा एमएसईबीच्या डीपीजवळ खाली पडलेल्या अवस्थेत दिसून आला. त्याचा हात डीपीच्या फ्यूज बॉक्सला लागलेला असल्याचे निदर्शनास आले. चुलता दत्तात्रय ढेबे व संजय हिरवे यांनी काठीच्या साहाय्याने त्याचा हात बाजूला करून तातडीने वेल्हे ग्रामीण रुग्णालयात नेले. मात्र,वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले.

Organic farming: सेंद्रिय शेतीचा चमत्कार! वेल्ह्यातील आदिवासी शेतकऱ्याच्या झाडाला तब्बल १९ किलोचा फणस; डोंगररानात सेंद्रिय शेतीची झेप..

याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार असून, वेल्हे पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी किशोर शेवते पुढील तपास करीत आहेत.

Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.