• शिंदेसेनेचे माजी आमदार शिरीष चौधरी यांच्यावर गुन्हा दाखल.


  • भाजप आमदार विजयकुमार गावित यांच्या नावाचे बनावट लेटरहेड वापरल्याचा आरोप.


  • नव्या कामांसाठी शासन निर्णय काढल्याचा दावा.



सागर निकवाडे, साम प्रतिनिधी


शिंदेसेनेच्या माजी आमदाराचा अनोखा कारनामा केल्याचा प्रकार समोर आलाय. याप्रकरणी माजी आमदार शिरीष चौधरी यांच्यावर नंदुरबारमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माजी आमदाराने भाजप आमदार डॉ. विजयकुमार गावितांच्या नावाचं बनावट लेटरहेड बनवलं. त्यावर बनावट स्वाक्षरी करुन जुने मंजुर कामांऐवजी नव्या कामांचा शासन निर्णय काढल्याचा धक्कादायक प्रकार उघड झालाय.

ऑपरेशन टायगर 4.0 लवकर होणार? नाशिकमध्ये ठाकरेंचे 12 नगरसेवक फुटणार?

माजी आमदारशिरीष चौधरी यांनी बनावट लेटरहेड बनवून नव्या कामांचा जीआर काढला. याप्रकरणी डॉ. विजयकुमार गावितांच्या स्वीय सहाय्यकांनी नंदुरबार शहर पोलीसात तक्रार दाखल केली होती, त्यानंतर त्यांच्याविरुद्धात गुन्हा दाखल करण्यात आलाय. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.


शिवसेनेचे माजी आमदार शिरीष चौधरी नगरसेवक गौरव चौधरी यांच्यासह चौघांनी बनावट लेटरहेड तयार करुन मंत्रालयात जमा केल्याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. विजयकुमार गावित यांनी नंदुरबार शहरातील विविध समाजांच्या सभागृहांसाठी आणि मंदिरांसाठी मंजुर केलेला शासकीय निधी आणाला होता. मात्र त्यांचेच बनावट लेटरहेड तयार करून मंजुर निधीपैकी ९ कोटी रुपयांचा निधी हा इतर वेगळ्याच कामांसाठी वर्ग करण्यात आला. याप्रकरणी नंदुरबार शहर पोलीस ठाणे येथे माजी आमदार शिरीष चौधरी व साथीदार यांचेवर गुन्हा दाखल करण्यात आलाय.

आणखी एक पक्ष फुटणार? भाजपकडून आमदारांना मंत्रिपदासह ३० कोटींची ऑफर; आरोपांमुळे राजकीय वर्तुळात खळबळ

डॉ. विजयकुमार गावित यांचे स्वीय सहाय्यक अशोक शिवाजी बेहेरे यांच्या तक्रारीनंतर चौकशीवरुन नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. भाजप आमदार गावित हे आदिवासी विकास मंत्री म्हणुन २०२२ - २०२४ च्या दरम्यान महाराष्ट्र शासनास शिफारस करुन नंदुरबार नगरपरिषद क्षेत्रातील विविध कामांसाठी शासन निर्णय क्रमांक नपावै-२०२३/प्र.क्र .३२८ (९८)/नवि- १६ मंत्रालय मुंबई दिनांक १९ जानेवारी २०२४ अन्वये ०५ कामे १० कोटी, २) शासन निर्णय क्रमांक नपावै-२०२३/प्र.क्र.७६५ (२४)/नवि-१६ (ई-६८३२६३) मंत्रालय मुंबई दिनांक २१ जुन २०२४, अन्वये १० कामे १५ कोटी, ३) शासन निर्णय क्रमांक नपावै-२०२३/प्र.क्र.२३८ (४७)/नवि-१६ (ई-८२३५०९) मंत्रालय मुंबई दिनांक २३ ऑगस्ट २०२४ अन्वये १२ कामे ९.५० कोटी रुपयाचा निधी मंजूर करुन घेतला होता.


मात्र आमदार गावित यांची प्रकृती बिघडली होती, त्यावेळी माजी आमदार श्री. शिरीष हिरालाल चौधरी,गौरव प्रकाश चौधरी, नयन दिलीप चौधरी, अकाउंटंट किशोर तुळशिराम पाटील रा. रनाळे व इतर अज्ञात इसम यांनी गुन्हेगारी स्वरुपाचा कट रचत आमदार गावित नावाचे दिनांक १८/०८/२०२५, दिनांक १५/११/२०२५, दिनांक ०५/०१/२०२६ रोजीचे २ असे एकुण ०४ बनावट लेटरहेड नंदुरबार शहरातील शिरीष चौधरी यांचे कार्यालयात तयार केली. त्यावर विजयकुमार गावितांची बनावट सही करुन मंत्रालयात सादर केले. त्यामुळे दिनांक १९/०१/२०२४, दिनांक २१/०६/२०२४, दिनांक २३/०८/२०२४ चे मुळ शासन निर्णयात शुद्धीपत्रकाव्दारे बदल करत एकूण ९ कोटी रुपये नंदुरबार शहरातील वेगळ्याच कामांसाठी वर्ग केली.

Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.