►वृत्तसंस्था लखनौ
उत्तरप्रदेशातील तीन मंदिर-मशीद वादांवरून हिंदू आणि मुस्लीम पक्षकारांनी सोमवारी सर्वोच्च न्यायालयाच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला आहे. हे वाद वाराणसीतील ज्ञानवापी मशीद, मथुरेतील श्रीकृष्ण जन्मभूमी-शाही ईदगाह आणि संभल येथील शाही जामा मशिदीशी निगडित आहेत.


सर्वोच्च न्यायालयाने याप्रकरणांच्या शांततापूर्ण तोडग्यासाठी ‘समाधान समारोह 2026’ पुढाकाराच्या अंतर्गत पत्र पाठवून मध्यस्थीचा प्रस्ताव दिला होता आणि दोन्ही पक्षकारांकडून सहमतीची मागणी केली होती. परंतु कुठल्याही पक्षकाराने याकरता सहमती दिली नाही.


न्यायालयात खटला चालवूनच निर्णय इच्छितो असे दोन्ही पक्षकारांनी सांगितले आहे. सर्वोच्च न्यायालय परिसरात 21-23 ऑगस्टपर्यंत ‘समाधान समारोह’ अंतर्गत विशेष लोकन्यायालय आयोजित केले जाईल. याचा उद्देश दीर्घ कायदेशीर लढाईऐवजी चर्चेतून तोडगा काढणे आहे.


1 ज्ञानवापी मशीद (वाराणसी)
वाद काय आहे : वाराणसीच्या काशी विश्वनाथ मंदिराला लागून स्थित ज्ञानवापी मशिदीवरून वाद आहे. 17 व्या शतकात मुघल शासक औरंगजेबने तेथे असलेले प्राचीन विश्वेवर (काशी विश्वनाथ) मंदिराला आंशिक स्वरुपात तोडत मशीद उभारल्याचा हिंदू पक्षकारांचा दावा आहे.


हिंदू पक्षकारांची मागणी…
-ज्ञानवापी परिसराला प्राचीन विश्वेश्वर मंदिर घोषित करण्यात यावे.
-मशीद परिसरात नियमित पूजेची अनुमती मिळावी.
-परिसरात मिळालेल्या धार्मिक अवशेषांना मंदिराचा हिस्सा मानले जावे.


मुस्लीम पक्षकारांची मागणी…
-ज्ञानवापीला मशिदीच्या रुपात कायम ठेवण्यात यावे.
-पूजास्थळ अधिनियम, 1991 अंतर्गत नवे दावे फेटाळण्यात यावेत.
-मशिदीत मुस्लिमांच्या नमाजाचा अधिकार सुरक्षित रहावा.
कुठे सुनावणी अन् वर्तमान स्थिती
वाराणसी जिल्हा न्यायालय, अलाहाबाद उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात पूजेचा अधिकार, पुरातत्व सर्वेक्षण, वजूखाना क्षेत्र आणि धार्मिक स्थळ अधिनियमाशी निगडित प्रकरणांवर सुनावणी सुरू आहे.


2 श्रीकृष्ण जन्मभूमी-शाही ईदगाह वाद (मथुरा)
वाद काय आहे : मथुरेत श्रीकृष्ण जन्मस्थानानजीक स्थित शाही ईदगाह मशिदीवरून वाद आहे. हे मशीद भगवान श्रीकृष्णांच्या जन्मभूमीवर उभारलेल्या मंदिराला तोडून निर्माण करण्यात आल्याचा हिंदू पक्षकारांचा दावा आहे.


हिंदू पक्षकारांची मागणी…
-शाही ईदगाह मशीद हटविण्यात यावी.
-पूर्ण भूमी श्रीकृष्ण जन्मभूमी ट्रस्टला सोपविण्यात यावी.
-मंदिराची पुनउ&भारणी करण्यात यावी.


मुस्लीम पक्षकारांची मागणी..
-मशिदीला वैध प्रार्थनास्थळ मानले जावे.
-1968 चा करार अन् पूजास्थळ अधिनियम, 1991 चे पालन केले जावे.
-याचिका फेटाळण्यात याव्यात.
कुठे सुनावणी अन् वर्तमान स्थिती
अलाहाबाद उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात भूमीची मालकी, सर्वेक्षण आणि 1968 च्या कराराच्या वैधतेशी निगडित अनेक खटले प्रलंबित आहेत.


३ शाही जामा मशिद वड (संभळ)
वाद काय आहे : संभल येथील जामा मशीद हे प्राचीन हरिहर मंदिर तोडून निर्माण करण्यात आली होती असा हिंदू पक्षकारांचा दावा आहे.
हिंदू पक्षकारांची मागणी…
-मशिदीचे पुरातत्व विभागाकडून सर्वेक्षण करविण्यात यावे.
-मंदिराचे अवशेष मिळाल्यास मंदिराला बहाल केले जावे.
-हिंदूंना पूजेचा अधिकार मिळावा.
मुस्लीम पक्षकारांची मागणी…
संभल येथील जामा मशिदीचा वादही बऱ्याच काळापासून सुरु आहे. मशिदीला ऐतिहासिक आणि वैध मानण्यात यावे. सर्वेक्षण आणि नव्या खटल्यांना रोखण्यात यावे. पूजास्थळ अधिनियम, 1991 लागू करण्यात यावा. अशी मागणी मुस्लीम पक्षकारांकडून करण्यात येत आहे.
याबाबतीतला न्यायालयीन वादावर चंदौसी नागरी न्यायालय, अलाहाबाद उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात सर्वेक्षण, त्याची वैधता आणि संबंधित कायदेशीर याचिकांवर सुनावणी सुरू आहे.







Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.