मुंबईतील तीन प्रसिद्ध हॉटेल्सचे अन्न परवाने रद्द केले.
ही कारवाई आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
भेंडीबाजार आणि उमरखाडी परिसरातील हॉटेल्स कारवाईच्या कक्षेत
अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढेयांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईत मोठी कारवाई करण्यात आली आहे. काय कारवाई दरम्यान मुंबईतील लोकप्रिय आणि नामांकित अशा तीन हॉटेल्सचे अन्न परवाने रद्द करण्यात आले आहेत. भेंडीबाजार आणि उमरखाडी परिसरातील या हॉटेल्सवर ही कारवाई करण्यात आली. हॉटेल्समध्ये अस्वच्छता दिसली तरी थेट परवाना रद्द होत असल्याने हॉटेल व्यावसायिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
मोठी बातमी! चार महिन्यातच तुकाराम मुंढेंना पालक सचिवपदावरून हटवलं परवाने रद्द का करण्यात आली आहेत?शालिमार हॉस्पिटॅलिटी, नूर मोहम्मदी हॉटेल,रहमानिया रेस्टॉरंट या तीन मोठ्या हॉटेल्सचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. एफडीएच्या अधिकाऱ्यांनी या हॉटेल्सची अचानक तपासणी केली. त्यावेळी तेथे स्वच्छता, अन्नसुरक्षा आणि परवाना नियमांचे उल्लंघन होत असल्याचे दिसून आले.
तुकाराम मुंढेंच्या बदलीचे धंदे बंद करा, नाहीतर...; जरांगे पाटलांचा सरकारला इशाराहॉटेल्सच्या स्वयंपाकघरात प्रचंड अस्वच्छता आढळून आली. किचनमध्ये कीटकांचा वावर दिसून आला. ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेची कोणतीही तपासणी केली नव्हती. हॉटेलमध्ये वापरल्या जाणाऱ्या कच्च्या मालाच्या खरेदीच्या नोंदी. तसेच वापरल्या जाणाऱ्या खाद्यतेलाच्या गुणवत्तेच्या नोंदी ठेवल्या गेल्या नव्हत्या. या त्रुटींमुळे ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ केला जात असल्याचे स्पष्ट करत एफडीएने थेट निलंबनाची कारवाई केलीय.
मुंबईतील ‘के. रुस्तम’चा परवाना रद्दमुंबईच्या चर्चगेट भागातील प्रसिद्ध आईस्क्रीम पार्लर 'रुस्तम'चा तदेखील परवाना रद्द करण्यात आलाय. या आउटलेटमध्ये जिवंत उंदीर, माश्या आणि एक्सपायरीचे खाद्यपदार्थ यांसारख्या गंभीर अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेच्या मानकांचे उल्लंघन होत असल्याचे आढळून आले होते. मुंबईसह एफडीएने आपला मोर्चा विदर्भाकडेही वळवलाय. अमरावती येथील प्रसिद्ध 'अमरावती दरबार' या हॉटेलला कोणतीही वैध अन्न परवाना नसताना व्यवसाय चालवल्याप्रकरणी नोटीस बजावण्यात आलीय.
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.