Delhi Police: दिल्लीतल्या जंतरमंतर मैदानावर बुधवारी (दि. २२) रात्री ९.३० वाजण्याच्या दरम्यान पुन्हा आंदोलक आणि पोलिस समोरासमोर आले. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून पोलिसांनी पुन्हा लाठीचार्ज केला आणि अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. दिल्लीमध्ये आंदोलकांची संख्या वाढली असल्याची माहिती आहे.

नेमकं काय घडलं?

आंदोलनात सहभागी झालेल्या काही तरुणांनी दगडफेक केल्याचं सांगितलं जातंय. पोलिसांनी गर्दी पांगवण्यासाठी अश्रुधुराचे नळकांडे फोडले असून लाठीचार्जही केला आहे. आंदोलन स्थळावर एवढे मोठे दगड आले कुठून, असा प्रश्न उपस्थित होत आहे. या हल्ल्यात पोलिस अधिकारी गंभीर जखमी झाले असून एनएसयूआयचे कार्यकर्तेही जखमी झाल्याची माहिती आहे.


दिल्ली पोलिसांच्या सूत्रांनी सांगितले की, नवी दिल्ली परिसरात इंटरनेट सेवा बंद करण्यात आली असली, तरी जंतरमंतर आणि कनॉट प्लेसचा परिसर, टॉलस्टॉय मार्ग आणि जनपथवर मोठ्या प्रमाणावर मेसेजिंग सुरू आहे. या भागात नेटवर्क कनेक्शन आणि एसएमएसची देवाणघेवाण अत्यंत वेगाने होत आहे. जंतरमंतरवर बसलेले आंदोलक नवी दिल्लीतील इतर भागात उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांना हिंसेचे आदेश देत आहेत का? असा पोलिसांना संशय आहे.

Sonam Wangchuk: रुग्णालयातून सोनम वांगचुक यांचा पहिला व्हिडिओ, सरकारला दिला 'असा' प्रस्ताव, भावनिक प्रतिक्रिया समोर

सूत्रांच्या माहितीनुसार, टॉलस्टॉय मार्गावर आंदोलक अचानक हिंसक झाले. त्यांनी सुरक्षा कर्मचाऱ्यांवर दगडफेक सुरू केली, ज्यामध्ये अनेक पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. या ठिकाणी आरएएफचे पथक आणि दिल्ली पोलिसांचे जवान तैनात होते. पोलीस आणि आरएएफच्या जवानांवर मोठे दगड फेकण्यात आले. काही आंदोलकांनी लाठ्या-काठ्यांनीही पोलिसांवर हल्ला केला. अनियंत्रित झालेल्या जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर केल्याची प्राथमिक माहिती आहे.


Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.