पुणे - आपल्या मुलीने किंवा मुलाने डॉक्टर व्हावं, हे पालकाचं स्वप्नं असतं. मात्र ऐन वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशाच्यावेळी खरी धाकधूक सुरू होते. प्रवेश प्रक्रियेत महाविद्यालय निवडताना आणि विविध नियमांप्रमाणे प्रक्रिया करताना विद्यार्थी-पालक गोंधळतात. वैद्यकीय प्रवेशाची हीच चिंता दूर करण्यासाठी ‘सकाळ विद्या’ आणि ‘वे टू ॲडमिशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या दोन ऑगस्टला ‘एमबीबीएस महाकुंभ’ आयोजित करण्यात आला आहे.
‘सकाळ’च्यावतीने पुण्यात हा महाकुंभ होणार आहे. शिवाजीनगर येथील मॉडर्न महाविद्यालयात दोन ऑगस्टला सकाळी अकरा ते दुपारी एक या वेळेत वैद्यकीय अभ्यासक्रमांतील तज्ज्ञ विद्यार्थी-पालकांना मार्गदर्शन करणार आहेत. विद्यार्थ्यांचा प्रवेश प्रक्रियेचा मार्ग सोपा करण्यासाठी आणि पालकांचा ताण हलका करण्यासाठी या महाकुंभचे आयोजन केले आहे. मार्गदर्शनपर चर्चासत्र असे या कार्यक्रमाचे स्वरूप असणार आहे.
चर्चासत्रात मार्गदर्शन करणाऱ्या मान्यवरांशी विद्यार्थी-पालकांना संवादही साधता येणार आहे. सत्रात वैद्यकीय शिक्षण क्षेत्रातील नामांकित आणि अनुभवी तज्ज्ञ डॉ. सचिन वाडेकर आणि डॉ. नीलेश मोहिते हे उपस्थित राहून विद्यार्थी आणि पालकांना थेट मार्गदर्शन करणार आहेत. वैद्यकीय अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया, ‘नीट’ परीक्षेतील कट-ऑफ नुसार महाविद्यालयांची निवड, याबाबत माहिती दिली जाणार आहे.
पुण्यातील चर्चासत्र
कधी - २ ऑगस्ट (रविवारी)
कोठे - मॉडर्न महाविद्यालय, शिवाजीनगर
केव्हा - सकाळी ११ ते दुपारी १
‘एमबीबीएस महाकुंभ’चे वैशिष्ट्य
विनामूल्य सेमिनार
मोफत वैयक्तिक समुपदेशन
सरप्राइज गिफ्ट
३० दिवसांसाठी ‘व्हॉट्सअॅप’द्वारे मार्गदर्शन
एमबीबीएस करायचे आहे, मग ते भारतात करायचे की परदेशात, याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. वैद्यकीय अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया कशी आहे, हे विद्यार्थी-पालकांना सांगितले जाणार आहे. वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी सर्वोत्कृष्ट विद्यापीठे, महाविद्यालये कोणती, त्यांचे शुल्क किती असते, अशी माहिती दिली जाणार आहे. याशिवाय विद्यार्थी-पालकांच्या प्रश्नांची उत्तरे दिली जातील.
- डॉ. नीलेश मोहिते, मार्गदर्शक
नीट परीक्षेचा निकाल लागला, आता पुढे काय करायचे?, अशी चिंता विद्यार्थी-पालकांना सतावत असते. एमबीबीएस करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना पडलेल्या प्रश्नांची उत्तरे चर्चासत्रात दिली जातील. वैद्यकीय अभ्यासक्रम भारतात आणि परदेशात करण्यासाठी आवश्यक प्रक्रिया समजावून सांगण्यात येणार आहे.
- डॉ. सचिन वाडेकर, मार्गदर्शक
अधिक माहितीसाठी संपर्क - ८८८८८०१४४१
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.