Mumbai crime News : अमली पदार्थ तस्करावर PIT-NDPS अंतर्गत कठोर कारवाई करण्यात आली आहे. मुंबई गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी कक्षाने ही मोठी कारवाई केली आहे. कुख्यात ड्रग्ज तस्कर उस्मान अब्दुल कादर शेख उर्फ सोनू (वय 37) याच्यावर PIT-NDPS अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. आरोपीला एक वर्षासाठी स्थानबद्ध (Preventive Detention) करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
24 जुलै 2026 रोजी तळोजा कारागृहात स्थानबद्धतेची अंमलबजावणी केली आहे. आरोपीवर NDPS कायद्यांतर्गत 4 गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत. जामिनावर सुटल्यानंतरही पुन्हा ड्रग्ज तस्करी सुरू ठेवल्याचा आरोप करण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने स्थानबद्धतेच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. 2026 मध्ये PIT-NDPS अंतर्गत अमली पदार्थ विरोधी कक्षाची 12 वी स्थानबद्धतेची कारवाई केली आहे. मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी कक्षाच्या आझाद मैदान युनिटची यशस्वी कामगिरी.
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.