मुंबई गुन्हे बातम्या: अमली पदार्थ तस्करावर PIT-NDPS अंतर्गत कठोर कारवाई करण्यात आली आहे. मुंबई गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी कक्षाने ही मोठी कारवाई केली आहे. कुख्यात ड्रग्ज तस्कर उस्मान अब्दुल कादर शेख उर्फ सोनू (वय 37) याच्यावर PIT-NDPS अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. आरोपीला एक वर्षासाठी स्थानबद्ध (Preventive Detention) करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
24 जुलै 2026 रोजी तळोजा कारागृहात स्थानबद्धतेची अंमलबजावणी केली आहे. आरोपीवर NDPS कायद्यांतर्गत 4 गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत. जामिनावर सुटल्यानंतरही पुन्हा ड्रग्ज तस्करी सुरू ठेवल्याचा आरोप करण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने स्थानबद्धतेच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. 2026 मध्ये PIT-NDPS अंतर्गत अमली पदार्थ विरोधी कक्षाची 12 वी स्थानबद्धतेची कारवाई केली आहे. मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी कक्षाच्या आझाद मैदान युनिटची यशस्वी कामगिरी.
मागील पाच दिवसाखाली अहिल्यानगर शहरात देखील पोलिसांनी मोठी करावाई केली होती. तोफखाना पोलिसांनी कारवाई करत जवळपास 35 लाखांचा 150 ग्रॅम एमडी (मेफेड्रोन) सदृश्य अमली पदार्थ जप्त केला होता. पोलिसांनी जिशान सय्यद, रेहान शेख आणि वसीम बागवान या तिघांना अटक केली आहे. एमडी सदृश्य पावडरचा पुरवठा कोठून आणि कोणासाठी आला होता याचा तपास सुरु आहे.
शहरासह जिल्ह्यात वाढत्या अमली पदार्थांच्या विळख्यामुळे अनेक तरुण व्यसनाच्या आहारी जाऊन गुन्हेगारीकडे वळत असल्याचा सातत्याने आरोप होत होता. अमली पदार्थांविरोधात काही दिवसांपूर्वी भाजप नगरसेवकांनी आंदोलन केले होते, तर श्रीरामपूरमधील हत्येनंतर निघालेल्या निषेध मोर्चातही ड्रग्जमुक्तीची जोरदार मागणी करण्यात आली होती. आता तोफखाना पोलिसांच्या कारवाईनंतर नगर शहरात एमडी ड्रग्जच्या वापरावर शिक्कामोर्तब झालंय. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी अमली पदार्थ तस्करीविरोधातील कारवाई अधिक तीव्र केली असून, या धडक कारवाईमुळे ड्रग्ज तस्करांमध्ये खळबळ उडाली आहे.
मुंबईत एक पोलीस काही विद्यार्थ्यांना ड्रग्जच्या खोट्या गुन्ह्यात अडकून आयुष्य बरबाद करण्याची धमकी देत असल्याचा व्हिडीओ सर्वच सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. या पोलिसाला तात्काळ निलंबित करून त्याची सखोल चौकशी करा, अशी मागणीसर्वच विरोधी पक्षांनी केली आहे.
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.