भायखळा : भायखळा पूर्व येथील हंसराज मार्ग स्थित ब्रिटिशकालीन भायखळा पोलिस ठाण्याच्या इमारतीला रविवारी (ता. २६) रात्री ८.३०च्या सुमारास अचानक आग लागली. पोलिस ठाण्याच्या पहिल्या मजल्यावरील प्रशासकीय आणि जनसंपर्क कार्यालयाला ही आग लागली. पोलिस ठाण्याचे स्लॅब, जिने आदी बहुतांश बांधकाम लाकडी असल्याने आग पसरल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.


​उपायुक्त जयंत मीना यांनी दिलेल्या माहितीनुसार, अग्निशमन दलाने त्वरित ही आग नियंत्रणात आणली. शॉर्टसर्किटमुळे आग लागली असावी, असा अंदाज असून आवश्यक ती कारवाई सुरू आहे. १९२४ मध्ये इंग्रजांनी मुंबईत ठरावीक पोलिस ठाण्यांची उभारणी केली. त्यात भायखळा पोलिस ठाण्याचा समावेश होता. स्कॉटलंड यार्ड पोलिसांप्रमाणे या पोलिस ठाण्याची संरचना आहे. शहरातील ऐतिहासिक वस्तूंमध्ये या पोलिस ठाण्याचा समावेश असून वर्षभरापूर्वीच केंद्रीय पुरातत्त्व विभागाच्या सूचनेनुसार दुरुस्ती, डागडुजी करण्यात आली होती.


स्वातंत्र्यपूर्व काळात स्थापना झालेल्या, ऐतिहासिक वास्तू असलेल्या भायखळा पोलिस ठाण्यात रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास आग भडकली. या घटनेत कोणीही जखमी झालेले नाही, असे पोलिस ठाण्यातून सांगण्यात आले. उपआयुक्त जयंत मीना यांनी दिलेल्या माहितीनुसार, अग्निशमन दलाने त्वरित ही आग नियंत्रणात आणली आणि विझविली. शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी असा अंदाज असून आवश्यक ती प्रक्रिया, कारवाई सुरू आहे.


पोलिस ठाण्याच्या पहिल्या मजल्यावरील निरीक्षक(प्रशासकीय), निरीक्षक(जनसंपर्क) यांच्या कार्यालयात आग लागली. पोलिस ठाण्याचे स्लॅब, जिने आदी बहुतांश बांधकाम लाकडी असल्याने आग पसरल्याचा अंदाज आहे. १९२४ मध्ये इंग्रजांनी मुंबईत ठराविक पोलिस ठाण्यांची उभारणी केली. त्यात भायखळा पोलिस ठाण्याचा समावेश होता. स्कॉटलंड यार्ड पोलिसांप्रमाणे या पोलिस ठाण्याची संरचना आहे.

Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.