गुन्हे बातम्या ठेवा: पुण्यात धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एक कोटी रुपयांच्या दरोडा टाकण्याचा प्रयत्न झाला पण तोतया पत्रकारासह दोन पोलिस कर्मचाऱ्यांचं बिंग फुटलं. या प्रकरणात पोलीसचं दरोडेखोरांच्या भूमिकेत होते. यात एका महिला पोलिस हवालदार आणि एका पोलिस नाईकाचाही या कटात सहभाग असल्याचं समोर आलं आहे. सुरुवातीला पोलिसांची आणि कथित पत्रकाराचे नावं गुन्ह्यातून वगळण्यात आलं होतं. मात्र पुन्हा पुरवणी गुन्हा जोडण्यात आला अन पुणे ग्रामीण पोलीस दलातील आणखी एक कारनामा उघड झाला आहे.


पुण्यातील तळेगाव दाभाडे येथील व्यावसायिक हर्षवर्धन पवारांसोबत हा दरोड्यांचा थरार घडला. हर्षवर्धन सोबत त्यांचे शेजारी किरण आपटे होते. किरण यांच्या ओळखीतील चव्हाण इंटरप्रायजेस यांना एक कोटी रुपयांची गरज होती. त्यामुळं किरण यांनी हर्षवर्धन यांना याबाबत कळवले, तेंव्हा ते एक कोटी रुपये देण्यास तयार झाले. 18 जुलैला तेचं एक कोटी रुपये देण्यासाठी हर्षवर्धन आपल्या कामगारासोबत दुचाकीवरून पुण्यातील सिंहगड रस्त्यावर आले. किरण आपटे ही तिथं पोहचले, हॉटेल ब्रम्हा जवळ ते थांबले. किरण आपटे ही तिथं पोहचले होते. दुपारी साडे बाराच्या सुमारास चव्हाण इंटरप्रायजेसची एक व्यक्ती चार चाकीतून हॉटेल जवळ आली. आपटे यांनी हर्षवर्धनला फोन केला. गाडी आलेली आहे, नऱ्हे येथील एचडीएफसी बँकेत आपल्याला ही एक कोटींची रक्कम भरायची आहे. तुम्ही या, आपण निघुयात. मग हर्षवर्धनने कामगाराला तळेगावला जायला सांगितलं. पुढं हर्षवर्धन, आपटे, विक्रम चाकणकर नावाचा चालक आणि त्याच्या बाजूला एक असे चौघे गाडीत बसलो. मी चालकाच्या मागे आणि आपटे माझ्या बाजूला बसले, आमच्या दोघांच्या मध्ये एक कोटी रुपयांनी भरलेल्या दोन बॅग होत्या. नऱ्हे पुलाच्या खालून बँकेकडे आम्हाला जायचं होतं, मात्र प्रत्यक्षात चालकाने गाडी थेट पुलावर घेतली. तितक्यात मागून एक दुचाकी आली आणि आमच्या गाडीला आडवी मारली. दुचाकीवरून दोघे खाली उतरले, त्यांनी मागची काच खाली घ्यायला लावली आणि आम्ही पोलीस आहोत, तुम्ही दोन नंबरचा माल घेऊन चाललेला आहात, याची आमच्याकडे माहिती आहे. तुम्ही हे पैसे घेऊन कुठं चाललाय, गाडी बाजूला घ्या. चालकाने गाडी बाजूला घेतली. मग दुचाकीवरील दोघे आणि आमच्या गाडीतील चालकाच्या बाजूची व्यक्ती असे तिघे मिळून हर्षवर्धन आणि आपटे कडील पैशांची बॅग बळजबरीने ओढू लागले. तितक्यात एकाने हर्षवर्धनच्या डोळ्यात मिर्ची पावडर फेकली. झटापट सुरुचं होती, अशात 73 लाख 50 हजार रुपयांनी भरलेली बॅग घेऊन आपटे कसेबसे गाडीतून खाली उतरले. पण हर्षवर्धन गाडीतून बाहेर पडू शकला नाही. मग दुचाकीवरील एका अनोळखी इसमाने चालकाला गाडी खेड शिवापूर पोलीस चौकीकडे घेण्यासाठी दमदाटी केली. मात्र हर्षवर्धनने गाडी बाजूला घ्यायला लावली. त्यावर त्या इसमाने चालकाला धमकावले आणि गाडी चालवायला भाग पाडले. अखेर दुपारी दोनच्या सुमारास गाडी खेड शिवापूर पोलीस चौकीत पोहचली. तिथं हा अनोळखी इसम खाली उतरला, चालकाकडून गाडीची चावी हिसकावून घेतली. मी पोलीस आहे आणि यांच्याकडे दोन नंबरचे पैसे आहेत. मी यांना पकडून इथं आणलं आहे. असं ओरडून सर्वांना सांगू लागला. त्यावेळी खेड शिवापूर पोलीस चौकीत त्या दिवशी सुट्टीवर असणाऱ्या पोलीस हवालदार प्रमिला निकम खाकी परिधान करुन उपस्थित होत्या आणि त्यांच्या मदतीला पोलीस नाईक अजित मेस्त्री ही होते. या दोघांनी त्या अनोळखी इसमाची म्हणजे तोतया पत्रकार आशिष तिवारीची बाजू घेतली आणि हर्षवर्धनला धमकवायला सुरुवात झाली.


तुम्ही दोन नंबरचा धंदा करताय, हा मोठा गुन्हा आहे. असं म्हणून हर्षवर्धनला अटकेची भीती घालण्यात आली. पण घडला प्रकार वरिष्ठ पोलिसांच्या कानावर पडला होता, ते तातडीनं खेड शिवापूर पोलीस चौकीत पोहचले अन या दोन पोलिसांसह कथित पत्रकाराचे बिंग फुटले. हर्षवर्धनच्या बॅगेतून सात-आठ लाख रक्कम ही गायब झाली होती, जी वरिष्ठांनी हस्तक्षेप केल्यानं परत देण्यात आली. त्यानंतर हर्षवर्धनने नऱ्हे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला. पण सुरुवातीला दोन पोलिसांची आणि तोतया पत्रकाराची नावं गुन्ह्यातून टाळली होती. नंतर पुरवणी गुन्ह्यात ती नावं पोलिसांनी समाविष्ट करावी लागली.


या प्रकरणात स्वतःला पत्रकार सांगणारा आशीष तिवारी याला पोलिसांनी अटक केली आहे. घटनास्थळ आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत हा कट उघडकीस आणला. या दरोड्याच्या थराराने भयभीत झालेला हर्षवर्धन आता काहीचं बोलायला तयार नाहीये. साहजिक आहे, त्याच्यासोबत जे घडलंय ते खुपचं धक्कादायक आहे. तपासादरम्यान राजगड पोलीस ठाण्यात कार्यरत महिला पोलिस हवालदार प्रमिला निकम आणि पोलिस नाईक अजित इरफू मेस्री यांचा सहभाग असल्याचं निष्पन्न झालं. या प्रकरणी एकूण दहा आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चौघांना अटक ही करण्यात आलीये. मात्र दोन्ही पोलिस कर्मचारीसह सहा जण सध्या फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. या प्रकरणामुळे पुणे ग्रामीण पोलिस दलात मोठी खळबळ उडाली आहे. काही दिवसांपूर्वी पुणे ग्रामीण पोलीस दलातील कामशेत पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी खंडणी उकळण्याचा प्रताप केला होता, आता याचं पुणे ग्रामीण पोलिसांच्या राजगड पोलीस स्टेशनमधील दोघांनी दरोडा टाकण्याचा कारनामा केलाय. रक्षकचं कसे भक्षक बनू लागलेत, हे सांगण्यासाठी ही उदाहरणे पुरेशी आहेत.









Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.