पुणे : गंज पेठेतील महात्मा फुले वाडा आणि सावित्रीबाई फुले स्मारक कॉरीडॉरचे काम अतिशय संथ गतीने सुरु आहे. राज्य सरकारकडून सर्व प्रकारचे सहकार्य केले. अनेकदा बैठका झाल्या पण पुणे महापालिकेकडून हवे तसे सहकार्य केले जात नाही, अशी टीका अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केली.


छगन भुजबळ यांनी आज भिडे वाडा स्मारकाच्या कामाची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. भुजबळ म्हणाले, ‘‘शहरातील विकासकामे ज्या वेगाने होणे अपेक्षित आहे, त्या वेगाने होत नाहीत. मी संपूर्ण शहरभर फिरलेलो नाही; मात्र महापालिकेच्या कामांची गती संथ आहे. फुले वाड्याच्या विस्तारीकरणाच्या कामाचाही आढावा घेतला. या प्रकल्पासाठी २०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यासंदर्भात बैठका घेतल्या. त्यानंतरही तेथील कामाची प्रगती समाधानकारक नाही. त्यामुळे या स्मारकाचे कामही रखडले आहे.


फुले वाड्याचा इतिहास विद्यार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानासह ऑडिओ-व्हिडिओ माध्यमांचा वापर करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचेही भुजबळ यांनी सांगितले. प्रत्येक मजल्यावर कोणत्या ऐतिहासिक गोष्टी आणि सुविधा असाव्यात, याचे नियोजन करण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


फुले वाड्यात खासदार डॉ. मेधा कुलकर्णी यांनी वडाच्या झाडाची पुजा केली त्यावर भुजबळ म्हणाले, ‘‘मला त्यांच्याबद्दल आदर आहे. पण प्रत्येक ठिकाणाचे महत्व, भावना वेगळ्या असतात. फुले वाडा समाजसुधारकांची भूमी आहे. तेथे असे करणे किती योग्य आहे याचा विचार करावा.

Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.