Arundhati Choudhary wins gold Commonwealth Games 2026: भारतीय बॉक्सिंगपटूंनी राष्ट्रकुल स्पर्धा इतिहासातील सर्वोत्तम कामगिरीची नोंद २०२६ च्या ग्लासगो स्पर्धेत केली. भारताने आतापर्यंत बॉक्सिंगमध्ये ५ सुवर्ण व १ रौप्य अशा पाच पदकांची कमाई केली. नवी दिल्ली २०१०, गोल्ड कोस्ट २०१८ आणि बर्मिंगहॅम २०२२ च्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय बॉक्सिंगपटूंनी तीन सुवर्णपदकं जिंकली होती. तो विक्रम यंदा मोडला गेला आणि त्यात महिलांच्या ७० किलो वजनी गटात राजस्थानच्या अरुंद्धती चौधरीने सुवर्णपदकाच्या लढतीत इंग्लंडच्या चांटेले रैडचा पराभव केला.
प्रीती पवार ( ५४ किलो) व जैस्मिन लम्बोरिया ( ५७ किलो) यांनी सकाळच्या सत्रात सुवर्णपदक जिंकली. पण, जादुमणी सिंगला ( पुरुषांच्या ५५ किलो ) रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. सायंकाळच्या सत्रात बॉक्सिंगच्या पटकांमध्ये साक्षी चौधरी ( ५१ किलो) आणि प्रिया घंघास ( ६० किलो) यांनी आणखी दोन सुवर्णपदकांची भर घातली. साक्षीने ५१ किलो वजनी गटाच्या फायनलमध्ये ५-० अशा फरकाने इंग्लंडच्या रुबी व्हाईटला पराभूत केले. प्रियाने ६० किलो वजनी गटात कॅनडाच्या मारीए-बॅथोल अल अहमदीवर ४-१ असा विजय मिळवला.
Commonwealth Games 2026 : २२ वर्षीय प्रियाची पहिलीच राष्ट्रकुल स्पर्धा अन् सुवर्णपदक... शेतकऱ्याच्या लेकीने इतिहास घडवलाराजस्थानच्या कोटा येथील २३ वर्षीय अरुंद्धतीने ७० किलो वजनी गटात इंग्लंडच्या चांटेले रैडला कडवी टक्कर दिली. २०२५ च्या वर्ल्ड बॉक्सिंग कप चॅम्पियन स्पर्धेत अरुंद्धतीने सुवर्णपदक जिंकले होते. २०२६ मध्ये ती आशियाई चॅम्पियन ठरली होती. खेलो इंडियामध्ये तीने २०१८, २०१९ व २०२० असे सलग तीन पर्व सुवर्णपदक जिंकली आहेत. त्यामुळे आज तिच्याकडून सुवर्णपदकाचीच अपेक्षा होती आणि ती त्यावर खरी उतरली. तिने ५-० असा एकतर्फी निकाल लावला. या पदकांसह भारत एकूण ११ सुवर्ण, १५ रौप्य व ८ कांस्य अशा एकूण ३४ पदकांसह चौथ्या क्रमांकावर आला.
Arundhati Choudhary wins gold Commonwealth Games 2026
तत्पूर्वी, पुरुषांच्या पॅरा F57 Shot Put प्रकारात सोमन राणा व शुभम जुयाल यांनी अनुक्रमे सुवर्ण व रौप्यपदक जिंकले, तर पुरुषांच्या तिहेरी उडीत प्रविण चित्रावेलने रौप्य व सेल्वा प्रभू थिरुमारनने कांस्यपदकाची कमाई केली. ज्युदोपटू उन्नती शर्माने महिलांच्या ६३ किलो वजनी गटात कांस्यपदक पटकावले.
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.