Sakshi Chaudhary Bags Boxing Gold, Unnati Sharma Takes Judo Bronze: भारताला राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा२०२६ मध्ये बॉक्सिंगमध्ये आणखी एक सुवर्णपदक मिळाले. साक्षी चौधरीने ५१ किलो वजनी गटाच्या फायनलमध्ये इंग्लंडच्या रुबी व्हाईटला पराभूत केले आणि आजच्या दिवसातील तिसरे सुवर्णपदक निश्चित केले. बॉक्सिंगमधील हे चौथे पदक ठरले. तेच ज्युदोत उन्नती शर्माने ६३ किलो वजनी गटात कांस्यपदकाची कमाई केली. तिने दक्षिण आफ्रिकेच्या स्काई क्नोएस्टरचा इप्पोन ( Ippon) डाव टाकून एकतर्फी पराभव केला.
शुक्रवारी ज्युदोमध्ये ऐतिहासिक दोन सुवर्ण व एक रौप्यपदक जिंकल्यानंतर नीरज चोप्राने भालाफेकीत ८ वर्षानंतर राष्ट्रकुल पदक जिंकले. तेजस्विन शंकरने डॅकेथलॉनमध्ये भारताला पहिलेवहिले पदक जिंकून दिले. त्यात शनिवारी बॉक्सिंगपटूंनी दुपारच्या सत्रात दोन सुवर्ण व एक कांस्यपदकाची भर घातली. प्रीती पवार व जैस्मिन लम्बोरिया यांनी अनुक्रमे ५४ व ५७ किलो वजनी गटात सुवर्ण जिंकले. पुरुषांच्या ५५ किलो वजनी गटात जादुमणी सिंगला रौप्यवर समाधान मानावे लागले.
Commonwealth Games 2026: अपघातात पाय गमावला, बॉक्सरचा गोळाफेकपटू झाला... सोनम राणाने ऐतिहासिक सुवर्ण जिंकले; दोन रौप्यपदकही खात्यात आलेMen's F57 Shot Put प्रकारात सोमन राणा व शुभम जुयाल यांनी अनुक्रमे सुवर्ण व रौप्यपदक जिंकले, तर पुरुषांच्या तिहेरी उडीत प्रविण चित्रावेलने रौप्य व सेल्वा प्रभू थिरुमारनने कांस्यपदकाची कमाई केली. कालचा दिवस ज्युदोपटूंनी गाजवला असला तरी आज भारताच्या वाट्याला या क्रीडा प्रकारात निराशा आली. ज्युडोपटू हर्ष टोकसने पुरुषांच्या ८१ किलो वजनी गटात रेपचेज फेरीत सामोआच्या पेनियामिना पर्सीव्हलवर विजय मिळवून कांस्यपदकाच्या फेरीत प्रवेश केला आहे. ६३ किलो वजनी गटात उन्नती शर्माही कांस्यपदकासाठी खेळली.
हर्षसमोर कांस्यसाठी ऑस्ट्रेलियाच्या केइशीन ओचीचे, तर उन्नतीसमोर दक्षिण आफ्रिकेच्या स्काय क्नोएस्टरचे आव्हान आहे. उन्नती शर्मा ही मूळची डेहराडून, उत्तराखंड येथील रहिवासी आहे. तिने अगदी लहान वयातच खेळायला सुरुवात केली होती. तिच्या परिसरामध्ये जुडो खेळणारी आणि भारताचे प्रतिनिधित्व करणारी ती पहिली मुलगी आहे. हर्ष दिल्ली येथील मुनिरका परिसरातील २३ वर्षांचा खेळाडू आहे. वयाच्या अवघ्या १० व्या वर्षापासून त्याने मुनिरका येथील एका मोफत जुडो अकॅडमीमधून या खेळाचे धडे गिरवण्यास सुरुवात केली.
Commonwealth Games 2026: दे दणा दण... पोरींनी जिंकली २ सुवर्ण! प्रीती पवार, जैस्मिन यांचा गोल्डन पंच; तिहेरी उडीत रौप्य व कांस्य...भारतीय बॉक्सिंगचे मुख्य केंद्र असलेल्या भिवानी, हरियाणा येथील २५ वर्षीय साक्षीने २०१२ मध्ये प्रसिद्ध प्रशिक्षक जगदीश सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण सुरू केले. खेळासोबतच ती भारतीय सैन्यात (Indian Army) हवालदार म्हणून देशसेवा करत आहे आणि प्रामुख्याने आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूट (ASI), पुणे येथे सराव करते. तिने महिलांच्या ५१ किलो फ्लायवेट गटाच्या सुवर्णपदक जिंकले.
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.