आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजच्या काळात देखील अनेकांना मार्गदर्शक ठरतात. चाणक्य आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये म्हणतात या जगात असे काही लोक असतात, ज्यांची कोणीही सहज फसवणूक करतं, त्यांच्यासोबत कायम विश्वासघात होतो. त्यासाठी या माणसांमध्ये असलेल्या काही सवयी जबाबदार असतात, या सवयींमुळेच माणसाला भविष्यात फार मोठं नुकसान सहन करावं लागू शकतं, त्यामुळे अशा सवयींचा वेळीच त्याग करणं हिताचं असतं. तसेच समाजात वावरताना माणसाने नेहमी सतर्क असावं, असा सल्ला देखील चाणक्य यांनी दिला आहे, चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.


भोळा स्वभाव – चाणक्य म्हणता या जगात असे काही लोक असतात ज्यांच्या स्वभाव हा खूप भोळा असतो, असे लोक दयाळू देखील असतात, असे लोक कोणालाही गरज लागली तर पटक त्यांच्या मदतीला धावून जातात, मात्र अनेकदा समजात अशा लोकांच्या स्वभावाचा फायदा घेतला जातो.


दुसर्‍यावर अवलंबून असणं – आर्य चाणक्य म्हणतात माणसाने स्वावलंबी असावं, जे लोक प्रत्येक गोष्टीसाठी इतर लोकांवर अवलंबून असतात, अशा लोकांचा आयुष्यात मोठा विश्वासघात होण्याची शक्यता असते, लोक तुमच्या या सवयीचा फायदा घेऊ शकतात.


दुसर्‍यावर विश्वास – चाणक्य म्हणतात जे लोक पटकन दुसर्‍यावर विश्वास ठेवतात, त्या लोकांचा देखील विश्वासघात होऊ शकतो. त्यामुळे कोणावरही विश्वास ठेवायचा असेल तर अशा व्यक्तीला प्रत्येक कसोटीवर तपासून पाहिलं पाहिजे, असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे.


भावनांवर स्वार होऊन निर्णय घेणं – चाणक्य म्हणतात तुम्हाला आयुष्यात जेव्हा एखादा मोठा निर्णय घ्यायचा असेल तर असा निर्णय तुम्ही कधीही भावनिक होऊ घेऊ नका, जर तुम्ही प्रत्येक निर्णय हा भावनिक होऊन घेत असाल तर तुमची फसवणूक होऊ शकते.


स्तुतीने प्रभावित होणे – चाणक्य म्हणतात अनेक लोकांना आपली स्तुती आवडते, लोक स्तुतीने प्रभावीत होतात, परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, जे लोक तुमची स्तुती करतात, तेच लोक तुम्हाला धोका देखील देतात, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.


(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.