Mumbai News : सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण यांचा राजीनामा राज्याचे मुख्य सचिवांना मिळाला आहे. मुख्य अभियंता अतुल चव्हाण यांचा राजीनामा (Resignation of Chief Engineer Atul Chavan) राज्याचे मुख्य सचिव यांना मिळाल्यानंतर सचिवांकडून पुढील प्रक्रियेला सुरुवात करण्याच आल्याची माहिती मिळत आहे. अतुल चव्हाण यांच्याबाबत लोकप्रतिनिधींकडून प्राप्त तक्रारींची चौकशी सुरू झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.
अतुल चव्हाण हे भाजप आमदार अनुराधा चव्हाण यांचे पती आहेत.पदोन्नतीच्या नाराजीतून राजीनामा दिल्याची चर्चा असली तरी त्यांना अपेक्षित पदन्नोतीत इतर ही अधिकारी असल्याने त्यांना आताच मिळणे शक्य नसल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागातील विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. अतुल चव्हाण यांच्याबाबत लोकप्रतिनिधींकडून प्राप्त तक्रारींची चौकशी सुरू झाल्याची माहिती आहे.
अतुल चव्हाण यांच्या पत्नी अनुराधा चव्हाण या फुलंब्री विधानसभा मतदारसंघाच्या भाजपच्या आमदार आहेत. एकाच कुटुंबात राजकारण आणि प्रशासनातील महत्त्वाची पदे असल्याने काहींनी शासनाकडे त्यांच्याविरोधात तक्रारी केल्याची चर्चा आहे. या राजकीय घडामोडींनंतर शासनाने 22 जून रोजी चव्हाण यांची नगर परिषद प्रशासन संचालनालय, वरळी (मुंबई) येथे मुख्य अभियंता म्हणून बदली केली होती आणि त्यांना 31 जुलै रोजी तेथे रुजू होण्याचे आदेश देण्यात आले होते. सचिवपदाच्या पदोन्नतीसाठी पात्र असल्याने त्यांना संधी मिळेल अशी अपेक्षा होती. पदोन्नतीची फाईल शासनदरबारी सादरही झाली होती; मात्र 31 जुलैच्या सायंकाळपर्यंत त्यावर कोणताही निर्णय झाला नाही. पात्र अधिकाऱ्यांना डावलून इतरांना संधी दिली जात असल्याच्या नाराजीतून चव्हाण यांनी 32 वर्षांची सेवा थांबवण्याचा निर्णय घेतला. शासकीय नियमानुसार ते मार्च 2030 मध्ये सेवानेवृत्त होणार होते, मात्र चार वर्षे आधीच त्यांनी राजीनामा दिला.
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.