Sachin Siwach defeats Tryagain Morning Ndevelo: आशियाई चॅम्पियनशिप रौप्यपदक विजेत्या सचिन सिवाचने ( Sachin Siwach) राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ च्या पुरुषांच्या ६० किलो वजन गटात नामिबियाच्या ट्रायगेन मॉर्निंग न्देव्हेलो याचा ३-२ असा पेनल्टी/स्प्लिट डिसीजनने पराभव करत सुवर्णपदक पटकावले. दुसऱ्या फेरीत सचिनचा एक गुण (Point Deduction) कमी करण्यात आला होता, परंतु तिसऱ्या फेरीत त्याने जबरदस्त पुनरागमन करत नामिबियन बॉक्सिंगपटूला नॉकडाऊन केले आणि आपला विजय निश्चित केला. या विजयासह पुरुषांच्या बॉक्सिंगमध्ये भारताला पहिलं सुवर्णपदक मिळाले असून, भारतीय पथकाच्या खात्यातील हे १२ वे सुवर्णपदक ठरले आहे
बॉक्सिंगपटूंनी यंदाची राष्ट्रकुल स्पर्धा गाजवली... साक्षी, प्रीती, जैस्मिन, प्रिया व अरुंद्धती यांच्या सुवर्णपदकासह जादुमणी व लव्हलिना बोरगोहैन यांनी रौप्यपदक जिंकले. भारतीय बॉक्सिंगपटूंची ही स्पर्धा इतिहासातील सर्वोत्तम कामगिरी ठरली. प्रीतीने ५४ किलो वजनी गटाच्या अंतिम सामन्यात कॅनडाच्या स्कार्लेट डेलगाडोवर ५-० असा एकतर्फी विजय मिळवला. त्यानंतर ५७ किलो वजनी गटात भारताच्या जैस्मिनने मिचेल वॉल्शचा, साक्षीने ५१ किलो वजनी गटात इंग्लंडच्या रुबी व्हाईटचा, ६० किलो वजनी गटात प्रियाने कॅनडाच्या मॅरीए-अल अहमदैहचा पराभव केला.
Commonwealth Games 2026: धक्कादायक... ऑलिम्पिक पदक विजेत्या लव्हलिना बोरगोहैनचे सुवर्ण हुकलं...७५ किलो वजनी गटात लव्हलिना बोरगोहैनला ऑस्ट्रेलियाच्या एम्मा-सुई-ग्रीनट्रीविरुद्धच्या अटीतटीच्या लढतीत हार पत्करावी लागली. पुरुषांच्या ५५ किलो वजनी गटात जादुमणी सिंगला ऑस्ट्रेलियाच्या जेकब सेसरने पराभूत केले. सचिन सिवाच आणि नामिबियाच्या ट्रायगेन मॉर्निंग एनडेलेव्हो यांच्यातला सामना संघर्षपूर्ण राहिला. पिछाडीवरून पुनरागमन करताना सचिनने ६० किलो वजनी गटाची ही फायनल ३-२ अशी रोमहर्षक जिंकली. भारताचे बॉक्सिंगमधील हे सहावे सुवर्णपदक ठरले.
सचिनने २०१६ च्या वर्ल्ड युथ चॅम्पियनशिपमध्ये, २०१७ च्या कॉमनवेल्थ युथ गेम्समध्ये सुवर्णपदक पटकावले होते. २०१९ मध्ये त्याने दक्षिण आशियाई खेळांमध्ये रौप्यपदक मिळवले, तर २०२५च्या वर्ल्ड बॉक्सिंग कपमध्ये ६० किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकले होते. आज त्याने राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदकही नावावर केले. सामन्याच्या दुसऱ्या फेरीत सचिनचा एक गुण वजा करण्यात आला. या निर्णयामुळे त्याच्यावर दबाव निर्माण झाला होता. मात्र भारतीय बॉक्सरने हार मानली नाही.
Commonwealth Games 2026: बॉक्सर्सची गोल्डन कामगिरी! ३० मिनिटांत ३ सुवर्णपदकं... अरुंद्धती चौधरीचे निर्विवाद वर्चस्व; भारताची Medal Tally मध्ये मोठी झेप...तिसऱ्या आणि निर्णायक फेरीत त्याने आक्रमक खेळ करत प्रतिस्पर्ध्यावर मुक्क्यांचा अक्षरशः वर्षाव केला. सचिनच्या अचूक पंचांमुळे नामिबियाचा बॉक्सर नॉकडाऊन झाला आणि सामन्याचे पारडे पूर्णपणे भारताच्या बाजूने झुकले. अखेरीस पंचांनी ३-२ असा निकाल सचिनच्या बाजूने दिला आणि भारताच्या खात्यात पुरुष बॉक्सिंगमधील पहिले सुवर्ण जमा झाले. या विजयासह भारताच्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ मधील १२व्या सुवर्णपदकाची नोंद झाली.
Sachin Siwach wins gold Commonwealth Games 2026
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.