मंगळवेढा : सुसंस्कृत महाराष्ट्राला लागलेला कलंक म्हणजे शिवसेना खासदार संजय राऊत आहेत. पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यावर बोलण्याची त्यांची लायकी तरी आहे का ? अभिजीत दीपके यांना बाप मानणाऱ्या खा. संजय राऊत यांनी अगोदर स्वतःची लायकी ओळखावी असा सवाल भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे माजी जिल्हाध्यक्ष सुदर्शन यादव यांनी केला.
पत्रकारानी शिवसेना खासदार संजय राऊत यांना पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या बद्दल प्रश्न विचारला असता त्यावर बोलताना खा.संजय राऊत यांनी पालकमंत्री गोरे यांच्यावर वापरलेल्या शब्दप्रयोगावर प्रत्युत्तर देताना माजी जिल्हाध्यक्ष सुदर्शन यादव म्हणाले की.पालकमत्री जयकुमार गोरे हे माण सारख्या दुष्काळी तालुक्यातून चार टर्म निवडून आलेले आहेत.
त्यांची बरोबरी करण्याची त्यांची लायकी तरी आहे का ? खरं तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत नापास झालेली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा प्रवक्ता वाचाळवीर खा. संजय राऊत हेच मुळात महाराष्ट्राला लागलेला कलंक आहेत.आमदार व खासदारातून फुकट खासदार झालेल्या यांनी खा.राऊत अगोदर पालकमंत्री गोरेवर बोलण्यात इतकी आपली पात्रता अगोदर तयार करावी.
त्यांनी जी अश्चिल भाषा वापरली ती भाषा आम्हाला देखील वापरता येते आणि त्यासाठी आम्ही खमक्या आणि ठाम आहोत भविष्यात त्यांनी आपल्या भाषेवर आवर घालावा अन्यथा त्यांच्या प्रत्येक भाषेला उत्तर देण्यासाठी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता ठाम असल्याचे प्रत्युत्तर सुदर्शन यादव यांनी सोशल मीडियात व्हिडिओद्वारे व्यक्त केले एकूणच पालकमंत्री गोरेवर खा संजय राऊत यांनी केलेल्या आरोपाला माजी जिल्हाध्यक्ष यादव यानी दिलेल्या प्रतिउत्तराने जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली.
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.