ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 3 ऑगस्ट 2026 | सोमवार


1. भाजपला बिहारमधील पोटनिवडणुकीत मोठा धक्का,  राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांच्या मतदारसंघात जनसुराजच्या प्रशांत किशोर यांचा मोठा विजय, 19 हजार मतांनी भाजपच्या उमेदवाराचा पराभव, ही फक्त आमदारकीची नाही, तर केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी निवडणूक,  प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया https://tinyurl.com/9wdbss9y  बांकीपूरमध्ये आम्ही कुत्र्या-मांजराला उभं केलं तरी निवडून येईल..' भाजपला रविशंकर प्रसाद यांचं वक्तव्य भोवल्याची चर्चा https://tinyurl.com/hhuxzfxw 


2. महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणाच्या आरोपातून भाजपचे माजी खासदार बृजभूषण सिंह आणि विनोद तोमर निर्दोष, न्याय मिळाल्याची बृजभूषण यांची प्रतिक्रिया, तर महिला कुस्तीपटूंची हायकोर्टात धाव https://tinyurl.com/2s38ppx6  आमची आशा मावळलेली नाही, कुस्तीपटू आपला लढा सुरूच ठेवतील, विनेश फोगाट यांची पहिली प्रतिक्रिया  https://tinyurl.com/at9vkbc2 


3. आधी मोदींना त्यांची डिग्री दाखवायला सांगा, मग मी माझ्या शैक्षणिक खर्चाच्या कर्जाचा सगळा तपशील जाहीर करतो, वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी होताच अभिजीत दिपकेंचे आव्हान https://tinyurl.com/bdzjmaaz  विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल होणार नाही, मात्र 2700 गुन्हेगारांविरुद्धचा एफआयआर कायम राहील, दिल्ली आंदोलनावरुन केंद्र सरकारची भूमिका, तर आंदोलकांविरोधात कठोरपणे वागणाऱ्या पोलिसांना पाठीशी घालू नका, सर्वोच्च न्यायालयानं सुनावलं https://tinyurl.com/mr3p98mb 


4. मुंबईत मोठा SRA घोटाळा, प्रकल्पग्रस्तांसाठीच्या सदनिका नावावर करून देण्याच्या नावाखाली 47 जणांची फसवणूक झाल्याची तक्रार https://tinyurl.com/4twhycnb  एसआरए कार्यालयात आमदार रोहित पवार आणि आदित्य ठाकरेंची अचानक भेट, भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी https://tinyurl.com/5h4frfar 


5. मुंबई मनपाच्या इनोव्हा वाहन खरेदीवर मुख्यमंत्री फडणवीसांची नाराजी, जनतेचा पैसा विकासकामांसाठी वापरा उधळपट्टी थांबवा, मुख्यमंत्र्यांनी टोचले कान, सूत्रांची माहिती https://tinyurl.com/325sf4v7  E20 इंधनाविरोधात नागपुरात युवक काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या निवासस्थानावर जनआक्रोश मोर्चा, राजीनाम्याची आग्रही मागणी https://tinyurl.com/2zzy68np 


6. उद्धव ठाकरेंसोबतच्या बैठकीत ठाणे पदाधिकाऱ्यांच्या दोन गटात वाद, तरुण पंतप्रधानांना आव्हान देतायत आणि तुम्ही आपापसात भांडता? ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना झापलं https://tinyurl.com/yfzrp93j 


7. सरसंघचालक मोहन भागवत 6 ऑगस्टला मुंबईत जेन झींशी संवाद साधणार, 15 ते 19 वयोगटातील जवळपास दोन हजार विद्यार्थी संवाद कार्यक्रमात सहभागी होणार https://tinyurl.com/3fptzarp 


8. महाराष्ट्रात पावसाची संततधार सुरूच! साताऱ्याच्या कोयना-कृष्णा अन् वेण्णा नद्यांचा रौद्रावतार https://tinyurl.com/3tk3wax2  भिवंडीत मुसळधार पावसामुळे कामवारी नदीने ओलांडली धोक्याची पातळी https://www.youtube.com/watch?v=IqS4oqF42Z0 


9. आता खासगी वाहनांवर पोलीस लिहिल्यास कारवाई होणार, खासगी बाईक आणि कारवर पोलीस शब्द लिहिण्यास मनाई, वाहतूक विभागाचं पोलीस प्रशासनाला पत्र https://tinyurl.com/mvkfd78h 


10. भारतविरुद्धच्या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचा अंडर-19 संघ जाहीर, टीम इंडियाकडून वैभव सूर्यवंशीकडे सगळ्यांचं लक्ष https://tinyurl.com/49je7jmb  महिला आशिया कपसाठी टीम इंडियाचा संघ जाहीर, लॉर्ड्सवर शतक झळकावणाऱ्या यास्तिका भाटियाला डच्चू, विरोधकांना धडकी भरवणारा 15 धुरंधरांचा स्कॉड https://tinyurl.com/4ku5kpvf 


एबीपी माझा स्पेशल


लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय? https://tinyurl.com/3jan3w8x 


तरुणाई गुलामगिरीत अडकली, बाहरे निघण्यासाठी आता फक्त एकमेव मार्ग; तुकाराम मुंढेंचं आवाहन, नेमकं काय म्हणाले? https://tinyurl.com/4jk9fc2f 


एबीपी माझा Whatsapp Channel - https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w 

Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.