Atul Kulkarnis Wedding Pictures: मराठी कला विश्वातून एक आनंदाची बातमी समोर येत आहे. महाराष्ट्राची 'अप्सरा' अर्थात सोनाली कुलकर्णी (Sonali Kulkarni) हिच्या भावाचं लग्न झालं आहे. तो नुकताच लग्नबंधनात अडकला आहे. सोनाली कुलकर्णीच्या सख्ख्या भावाचं नाव अतुल कुलकर्णी (Atul Kulkarni) असे असे आहे. त्यानं नुकतंच लग्न केलं आहे. त्याच्या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे. सोनाली कुलकर्णीने आपल्या भावाच्या लग्नाच मनसोक्त आनंद लुटला. मेहेंदी आणि लग्न सोहळ्यातील फोटो सध्या समोर आले आहेत.
सोनाली कुलकर्णीचा मोठा चाहतावर्ग आहे. अभिनेत्री सोशल मीडियातही सक्रीय असते. आपल्या दैनंदिन आयुष्यात घडत असलेल्या घडामोडी अभिनेत्री शेअर करत असते. काही दिवसांपासून अभिनेत्रीच्या घरी लगीनघाई सुरु आहे. अलिकडेच अभिनेत्री आपल्या भावाच्या लग्नातील मेहेंदीचा व्हिडीओ शेअर केला आहे. सोनालीने आपल्या हातावर सुंदर मेहेंदी काढली. तिचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे.
View this post on Instagram
तिनं खास मेहेंदी सोहळ्यासाठी सिंपल लेहेंगा परिधान केला होता. तर, या मेहेंदी कलरच्या लेहेंग्यावर तिनं मोत्याचा फोर लेअर नेकलेस घातला होता. या न्यू लूकमध्ये सोनाली कुलकर्णी खूपच सुंदर दिसत होती. तिने मेहेंदी सोहळ्यात खूप एन्जॉय केला होता. तर, सोनाली कुलकर्णीचा भाऊ अतुल कुलकर्णी याने आपल्या लग्नात शाही लूक कॅरी केला होता. अतुल कुलकर्णीने आपल्या लग्नात ऑफ व्हाईट रंगाची सुंदर शेरवानी घातली होती.
तसेच त्याच्या पत्नीने गोल्डन, लाल रंगाची साडी नेसली होती. या साडीमध्ये त्याची पत्नी सुरेख दिसत होती. दोघांच्या लग्नात मराठी सिनेसृष्टीतील बरेच कलाकार उपस्थित होते. या खास लग्न सोहळ्यात प्रसिद्ध कोरिओग्राफर फुलवा खामकर, निर्माता सुहृद गोडबोले, ज्येष्ठ अभिनेत्री भारती आचरेकर उपस्थित होते. अतुल कुलकर्णीबद्दल बोलायचं झाल्यास, तो डान्स अन् मॉडेल असून, त्याचे फोटोस सोशल मीडियात व्हायरल होत असतात.
महत्त्वाच्या इतर बातम्या:
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.