नवी दिल्ली : बिहारमधील बांकीपूर (Bankipur) विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये जन सुराज पक्षाचे संस्थापक प्रशांत किशोर (Prashant Kishor) विजयी झाले आहेत. भाजपचा बालेकिल्ला असलेल्या बांकीपूरमध्ये प्रशांत किशोर यांनी मोठा विजय मिळवला. प्रशांत किशोर यांना मिळालेल्या यशाच्या पार्श्वभूमीवर राजदच्या खासदार मीसा भारती (Misa Bharati) यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. प्रशांत किशोर जिंकत असतील म्हणजेच भाजप जिंकतंय असं, मीसा भारती यांनी म्हटलं आहे. 


प्रशांत किशोर यांचा विजय


बिहार विधानसभेच्या बांकीपूर मतदारसंघात प्रशांत किशोर यांनी भाजप उमेदवार नीरज कुमार यांचा 18953 मतांनी पराभव केला. प्रशांत किशोर यांना 63203 तर नीरज कुमार यांना 44250 मतं मिळाली. राजदच्या उमेदवार रेखा गुप्ता या पोटनिवडणुकीत तिसऱ्या स्थानावर राहिल्या, त्यांना 14085 मतं मिळाली. गेल्या तीन दशकांपासून बांकीपूरच्या जागेवर भाजपचं वर्चस्व होतं. या पोटनिवडणुकीत भाजपच्या हातून ही जागा निसटली आहे. 


प्रशांत किशोर हेच भाजपचे उमेदवार : मीसा भारती


राजदच्या खासदार आणि लालू प्रसाद यादव यांच्या कन्या मीसा भारती यांची बांकीपूरच्या निकालासंदर्भात प्रतिक्रिया समोर आली आहे. प्रशांत किशोर हेच भाजपचे उमेदवार असल्याची टीका त्यांनी केली.  मीसा भारती यांनी एएनआयसोबत बोलताना म्हटलं की, भाजप उमेदवाराचा पराभव होत असला तरी तिथं प्रशांत किशोर जिंकत असतील तर तिथे भाजपचा विजय आहे.  तिथं उमेदवार बदलण्यात आले, उमेदवार बदलण्याचं कारण काय होतं? असा सवाल मीसा भारती यांनी केला. 


प्रशांत किशोर यांनी खूप आश्वासनं दिली आहेत, जी पूर्ण होणं अशक्य आहेत. कोणत्याही पार्टीचा आमदार, खासदार यांना ती आश्वासन पूर्ण करणं अवघड आहे, असंही मीसा भारती यांनी म्हटलं. 


मीसा भारती म्हणाल्या की हा भाजपचा बालेकिल्ला आहे, जिथं 35-40 वर्षांपासून काम झालं नाही. प्रशांत किशोर म्हणतात मुलांना पाटण्यातील खासगी शाळांमध्ये पाठवू, सरकारी शाळांमध्ये जाण्याची आवश्यकता नाही. जनतेला सत्य माहिती नाही, प्रशांत किशोर हेच भाजपचे खरे उमेदवार आहेत. जनतेला हे समजण्यासाठी वेळ लागेल मात्र जेव्हा ते जिंकतील तेव्हा हे पाहायला मिळेल. मीसा भारती यांनी यावेळी प्रशांत किशोर यांच्यावर जोरदार टीका केली. मीसा भारती म्हणाल्या प्रशांत किशोर हे भाजपचे लोमडी आहेत, कारण भाजप म्हणत होते की कुत्री मांजरं उभी केली तरी ते विजयी होतील. म्हणून ते भाजपचे लोमडी आहेत.  बिहारची जनता,  तरुण आणि मुलांना फसवलं जातंय, असं मीसा भारती यांनी म्हटलं. 


दरम्यान, प्रशांत किशोर यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना सम्राट चौधरी यांच्या जागेवर नवा मुख्यमंत्री नियुक्त करावा असा सल्ला दिला. 





Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.