Liquor Brands Banned नवी दिल्ली : अन्न सुरक्षा नियामक  FSSAI ने ओल्ड मोंक, एंटीक्विटी ब्लू व्हिस्की, रॉयल चॅलेंज व्हिस्की आणि बॅगपाइपर डीलक्स व्हिस्की सारख्या नामांकित दारुच्या ब्रँडसच्या काही वेरियंटसवच्या विक्रीवर बंदी घातली आहे. दारुमध्ये आर्टिफिशिअल फ्लेवर आढळले जे निश्चित उत्पादन मानकांनुसार नव्हते.
   


फ़ूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स अथॉरिटी ऑफ इंडिया (FSSAI) ने म्हटलं की त्यांना चौकशीत आढळलं की डियाजियो इंडियाच्या  यूनाइटेड स्पिरिट्स, इनब्रू बेवरेजेज आणि मोहन रॉकी स्प्रिंगवॉटर द्वारे बनवलेल्या काही उत्पादनांच्या दारु सारखी चव आणि गंध आणण्यासाठी बाहेरील आर्टिफिशिअल किंवा नेचर आयडेंटिकल फ्लेवरचा वापर केला गेला.  मात्र, त्यासाठी प्राकृतिक साहित्य आणि योग्य प्रकारे मॅच्युअर करण्याची  प्रक्रिया करणं आवश्यक होतं.  



एफएसएसएआयनं मध्य प्रदेशातील यूनाइटेड स्पिरिट्सच्या  एंटीक्विटी ब्लू व्हिस्की आणि रॉयल चॅलेंज व्हिस्की, इनब्रू बेवरेजेज ची बॅगपाइपर डीलक्स व्हिस्की आणि ओल्ड कास्क डीलक्स XXX रमच्या विक्रीस मनाई केली आहे. महाराष्ट्रात मोहन रॉकी स्प्रिंगवॉटर यांच्याकडून बनवल्या जाणाऱ्या ओल्ड मंकच्या तीन वेरियंटवर बंदी घालण्यात आली आहे. रॉयटर्स रिपोर्टनुसार कोणत्या भागात विक्रीस मनाई करण्यात आलीय या संदर्भातील स्पष्ट माहिती समोर आली नाही.


एफएसएसएआयच्या मते भारतात खाद्य सुरक्षा नियमांनुसार दारुच्या पेयांमध्ये नैसर्गिक फ्लेवरिंग पदार्थांच्या वापराला पंरवानगी दिली जाते. मात्र, FSSAI च्या प्रयोग शाळेत काही कंपन्यांच्या दारुत अशा प्रकारचे फ्लेवर मिळाले म्हणजेच रममध्ये रमचा फ्लेवर, व्हिस्कीमध्ये व्हिस्कीचा फ्लेवर जे भारतीय नियमांनुसार वापरण्याची परवानगी नाही. 


दरम्यान, भारत जगातील सर्वात मोठ्या मद्यविक्री बाजारांपैकी एक आहे. जिथं या इंडस्ट्रीचा वार्षिक महसूल 40 अब्ज डॉलर होण्याचा अंदाज आहे. मार्केट शेअर नुसार  यूनाइटेड स्पिरिट्सच्या माध्यमातून डियाजियो इंडिया देशातील सर्वात मोठी दारु कंपनी आहे. जी फ्रान्सच्या पेरनोड रिकार्डला आव्हान देते.  FSSAI नं जांच्यावर कारवाई केली त्या ब्रंडची दारु भारतात बनली आहे. यासाठी याची किंमतइम्पोर्टेड व्हिस्की, स्कॉच आणि प्रीमियम रमच्या तुलनेत कमी आहे. 

Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.